Viral Video : लग्नाचा दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास दिवस असतो. या दिवशी नवरदेव असो किंवा नवरी, दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळा तेज असतो. कारण या दिवसापासून दोघेही नव्या आयुष्याची सुरूवात करतात. लग्न म्हणजे नातेवाईक, मित्रमंडळी, गाणी, डान्स, कार्यक्रम, हटके प्रथा असे मजेशीर वातावरण दिसून येते. या दिवशी नवरी नवरदेवाच्या चेहऱ्यावर हास्य असते पण विचार करा, एखादी नवरी नटून बसलेली आहे आणि ती चक्क लग्नाच्य दिवशी अभ्यास करत असेल तर? तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे. सध्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक नवरी चक्क लग्नाच्या दिवशी अभ्यास करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या नवरीचे नाव सिमरनजीत कौर शर्मा आहे आणि तिने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सिमरनजीतच्या लग्नाच्या दिवशीचा आहे. नवरी बनलेल्या सिमरनजीतने लाल रंगाचा लेहेंगा घातला आहे. तिच्या वरमाला सुद्धा आहे. नवरीच्या पोशाखात ती खूप सुंदर दिसत आहे. तिच्या हातात फोन आहे पण फोटो किंवा इतर काही मजेशीर बघत नाही तर चक्क नोट्स वाचत आहे. हो, ही नवरी लग्नाच्या दिवशी अभ्यास करत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नवरीच्या आजुबाजूला नातेवाईक बसलेले आहे. पंडित सप्तपदी तयारी करत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नवरीची दया येईल. तिला लग्नाच्या दिवशी अभ्यास करावा लागत आहे कारण लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तिची परीक्षा आहे.
सिमरनजीत एक कंटेन्ट क्रिएटर आणि तिने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत पण या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा तुमची परीक्षा असते.”
पाहा व्हायरल व्हिडीओ
mxminniee या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लोक म्हणत असतील पंडितजी लवकर करा, सकाळी मुलीची परीक्षा आहे”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तिच्या डोळ्यातील भाव पाहून मला तिच्याबद्दल वाईट वाटले, पण तिला यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगायला मिळावे.” तर एका युजरने लिहिलेय, “अभ्यासाच्या प्रेशरमुळे ती आनंदी नाही, वाईट वाटले” आणखी एका युजरने लिहिलेय, “इतकं वाईट तर शत्रूबरोबर सुद्धा होऊ नये” एक युजर लिहितो, “अभ्यास करणारे कुठेही अभ्यास करतात” तर एक युजर लिहितो,”तिला सोडून सर्व जण तिचे लग्न एन्जॉय करत आहे.” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.