Couple’s Pre-Wedding Photo Shoot Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या लग्नसमारंभ सुरू आहे त्यामुळे लग्नातील कार्यक्रमाचे, डान्स गाणी, उखाण्याचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहे. काही लोक लग्नापूर्वी प्री वेडिंग फोटोशूट करताना दिसत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक जोडपे चक्क लालपरीमध्ये प्री वेडिंग फोटोशूट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. तुम्ही आजवर अनेक फोटोशूट बघितले असेल पण असा फोटोशूट पहिल्यांदाच बघाल. या व्हिडीओमध्ये तुम्हाला गावाकडचे राहणीमान दिसेल.
जोडप्याने लालपरीमध्ये केला प्री वेडिंग फोटोशूट (Couple’s Pre-Wedding Photo Shoot in Red MSRTC Bus)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक जोडपे लाल परीमध्ये फोटो शूट करताना दिसेल. ते जोडीने लालपरीमध्ये बसतात त्यानंतर बसस्टॉपवर तरुण पेपर वाचताना दिसतो आणि तिथून तरुणी जाते. त्यानंतर हे दोघेही हातात हात घेऊन बसस्थानकावर फिरताना दिसतात. त्यानंतर ते मार्केटमध्ये जातात आणि तिथे फोटो शूट करतात. रस्त्यावर फिरताना फोटोशूट करतात. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ ते फोटोशूट करतात. महाराजांना वंदन करताना ते दिसतात. पुढे ते दोघेही एका चहाच्या स्टॉलवर जातात आणि चहा पिताना दिसतात. संपूर्ण नारायणगावमध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणी फोटो शूट करताना दिसतात. सध्या या हटके फोटोशूटचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Photoshoot Viral Video)
santosh_gaikwad_18 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,
“नारायणगाव प्री वेडिंग फोटोशूट”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “नारायण गाव” तर एका युजरने लिहिलेय, ” हे तर नारायणगाव आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “पहिला लालपरीला मान” एक युजर लिहितो, “सुंदर फोटोशूट” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. नारायणगाव हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. येथे प्रति बालाजीचे सुंदर मंदिर आहे.