Viral Video : असं म्हणतात परिस्थिती माणसाला संघर्ष करायला सांगते. अनेक जण पोटापाण्यासाठी वाट्टेल ते करतात. अनेक लहान मुले शाळेत जाण्याच्या वयात किंवा खेळण्याच्या वयात पैसे कमावण्यासाठी संघर्ष करतात. सिग्नलवर असे अनेक मुले आपल्याला दिसतात, जे त्यांच्याजवळची वस्तू विकण्यासाठी उभे असतात. कधी आपल्या गाडीजवळ येतात आणि आपल्याला वस्तू खरेदी करण्यासाठी विनंती करतात. सध्या अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ तिच्याबरोबर धक्कादायक प्रकार घडला. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की ही चिमुकली रडत आहे. तिला ऑटोरिक्षाचालकाने एक झापड मारली कारण ती गुलाबाची फुले विकण्यााठी ऑटोरिक्षाच्या मागे धावत होती. ही घटना कोटा येथील आहे.

गुलाब विकणाऱ्याला चिमुकलीला रिक्षावाल्याने मारली झापड

एका तरुणाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याला ही चिमुकली हातात गुलाबाची फुले घेऊन रोड डिव्हायडर जवळ बसून रडताना दिसली. तेव्हा त्याने त्याची बाईक थांबवली आणि विचारपूस केली पण ती चिमुकली रडत होती आणि काहीही उत्तर देत नव्हती.

या व्हायरल व्हिडीओमध्ये त्या तरुणाने सांगितल्याप्रमाणे, ऑटोरिक्षा चालकाने मुलीला मारले आहे कारण ती त्याच्या ऑटोमागे धावत होती. तिला ऑटोरिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशाला गुलाब विकायचा होता. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की या तरुणाने चिमुकलीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तिला ठीक आहे का असे विचारले आणि गुलाब त्याला विकण्याची ऑफर दिली पण रडत असलेल्या चिमुकलीने त्यावर उत्तर देण्यास किंवा पैसे स्वीकारण्यास नकार दिला.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

ride_with_shikhar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “”पैसे मिळाले नाही म्हणून ती रडत नाही… जगाने तिला फेल केले म्हणून ती रडतेय. गुलाब विकण्यासाठी ऑटोरिक्षामागे धावल्याबद्दल ऑटोरिक्षाने या चिमुकलीला झापड मारली. मी थांबलो, ऐकले आणि तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. तिने स्वाभिमानाने नाही तर वेदनांमुळे पैसे नाकारले. चला चांगले माणूस बनू या. दयाळूपणा अजूनही अस्तित्वात आहे असा विश्वास कोणीतरी ठेवेल याचे कारण बना. “

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भावा तू फक्त त्या मुलीलाच नाही तर आम्हा सर्वांना खूश केले आहे” तर एका युजरने लिहिलेय, “भावा तू देवाचं मन जिंकलं” आणखी एका युजरने लिहिलेय, “भावना या पैशांपेक्षा जास्त मोलाच्या असतात” एक युजर लिहितो, “फक्त माणसात माणुसकी असायला पाहिजे” तर एक युजर लिहितो, “पैशांनी तिला रडवले नाही तर अनादर किंवा अपमानाने तिला रडवले” अनेक युजर्सनी यावर भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत.