Viral Video : अनेक लोक देवदर्शनासाठी धार्मिक स्थळांना भेट देतात. मनोभावे पूजा आराधना करतात. अनेक भक्त दरवर्षी केदारनाथ आणि बद्रीनाथला सुद्धा भेट देतात. येथील मंदिराचे दरवाजे धार्मिक विधींनुसार, विशिष्ट दिवशी उघडले जातात. या दरम्यान भक्तांची गर्दी दिसून येते. अनेक जण केदारनाथ आणि बद्रीनाथला जाऊन सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडीओ शेअर करतात. जास्तीत जास्त लोक फोटो किंवा बनवण्यासाठी तिथे जाताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही भक्त भांडण करताना दिसत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे लोक का भांडण करताहेत? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

हा व्हायरल व्हिडीओ बद्रीनाथ धामचा आहे. येथील मंदिरासमोर काही भक्त भांडण करताना दिसत आहे. तर इतर लोक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. पण ते भांडण थांबवायला तयार नाही. एक भक्त नाही तर एक ग्रुप दुसऱ्या ग्रुपबरोबर भांडण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.
एक्स पोस्टवरून शेअर केलेल्या या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असा दावा केला आहे की मंदिरासमोर फोटो काढण्यासाठी हे लोक एकमेकांबरोबर भांडण करत आहे. हे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. मंदिरात भक्त दर्शनासाठी येतात, फोटो काढण्यासाठी नाही. पण येथे तर चक्क लोक फोटो काढण्यासाठी भांडण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही संताप येईल.

व्हायरल व्हिडीओ

Ghar Ke Kalesh या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बद्रीनाथ मंदिराच्या गेटसमोर फोटो काढताना भक्तांमध्ये वाद झाला.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिलेय, “हे लोक दर्शनासाठी गेले होते का की फोटो काढण्यासाठी? तर एक युजर लिहितो, “हेच पाहायचं बाकी होतं” आणखी एका युजरने लिहिलेय, “फोटो काढण्यावर तिथे बंदी नाही का? तरीसुद्धा जर भक्त फोटो काढत असेल तर मंदिराचे सुरक्षा कर्मचारी काय करत होते.” एक युजर लिहितो, “कलियुगची भक्ती, फक्त शो ऑफ” तर एक युजर लिहितो, “मंदिराला तर सोडा आता” आणखी एक युजर लिहितो, “देव सर्वकाही पाहतोय” अनेक युजर्सनी व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.