सापाला पाहून भिती वाटते. सापाला पाहताच भल्याभल्यांना घाम फुटतो. काही साप विषारी असतात, त्यांचा दंश झाल्यास माणसाचा मृत्यू देखील होऊ शकतो. सामान्यपणे साप जमिनीवर बिळात राहतात. पण ते झाड, दगडं, पाणी अशा ठिकाणीही आढळून येतात. अगदी घरात घुसून किचन, टॉयलेटमध्ये साप लपून बसलेले असतात. अशी काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतीलच. सापाचे असे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण मुंबईतील सापाचा सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांचे डोळे गरगरल्याशिवाय राहणार नाही. मनात धडकी देखील भरू शकते. हा व्हिडिओ पाहून अनेकांना देखील आश्चर्याचा धक्का बसलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मिडीयावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मुंबईतील बदलापूर रेल्वे स्थानकावर ही घटना घडल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये एक नाग ऑटोरिक्षाच्या मागे लटकलेला दिसतो आहे. तो रिक्षाच्या छतावर जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. यावेळी काही ऑटोचालकही तेथे उभे असतात, ते सापाकडे बारकाईने लक्ष ठेवून असतात. व्हायरल क्लिप X वर (@ABHIKUS44168075) नावाच्या वापरकर्त्याने शेअर केली आहे. या तीस सेंकदाच्या व्हिडिओमध्ये साप सरपटत रिक्षाच्या छतावर जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अनेक लोकांनी हा व्हिडिओ आपल्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. इतक्या मोठ्या वस्तीत सापाला अचानक पाहून लोकांचीही तारांबळ उडाली.

(हे ही वाचा : पक्ष्याची शिकार करण्यासाठी खडकात लपला साप; विजेच्या वेगाने हल्ला केला अन्…, दुर्मिळ Video पाहून थक्कच व्हाल )

येथे पाहा व्हिडीओ

१२ ऑक्टोबर रोजी पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ पाहण्यात लोकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर अनेक युजर्सनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकानं लिहिलं, “हा कोब्रा आहे”, तर दुसरा म्हणाला, “नाग रिक्षावर कसा काय आला”, तर तिसरा व्यक्ती म्हणतो, “सापालाही मुंबईत फिरायचंय”, अशा मजेशीर प्रतिक्रिया युजर्सनी दिल्यात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video showing a cobra slithering on the back of an autorickshaw in badlapur railway station in mumbai has surfaced online pdb