Video Shows Between Groom And Bride Marriage Terrace Collapse : एका व्यक्तीचं लग्न ठरतं पण संपूर्ण कुटुंब या उत्साहात सहभागी व्हायला तयार असतो. अगदी साखरपुड्यापासून ते लग्नाची वरात मंडपात घेऊन जाण्यापर्यंत प्रत्येकाचा उत्साह काही औरच असतो. अगदी नवरा-नवरी एकमेकांना हार घालतात, ते सात फेरे घेताना, अगदी मंगळसूत्र आणि भांगेत कुंकू भरताना देखील अनेक जण दोन्ही जोडप्याचे क्षण अगदी आनंदाने बघत असतात. तर आज सोशल मीडियावर अशीच एक घटना घडली आहे; या व्हिडीओत लग्न विधी बघणाऱ्यांबरोब एक धक्कादायक घटना घडली आहे.
व्हायरल व्हिडीओ बहुतेक गावाकडचा आहे. गावातील घराच्या टेरेसवर मंडप बांधला आहे. लग्न विधी सुरु आहे आणि नवरा-नवरी टेरेसवर बांधलेल्या एका सुंदर मंडपात बसले आहेत. तसेच तिथे उपस्थित अनेक जण हा लग्न सोहळा अगदी उत्साहाने पाहत आहेत. पण, बघता-बघता टेरेसचा डाव्या बाजूचा काही भाग अचानक खाली कोसळतो. तसेच तिथे उभे असलेले सगळेच जण एकामागोमाग एक थेट खाली पडतात आणि थक्क होऊन जातात; जे पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
नशीब मंडप टेरेसच्या मधोमध बांधला होता (Viral Video)
लग्नाच्या विधी पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. पण, एकटक लग्न सोहळा बघत असताना अचानक काही अनपेक्षित घडले तर कोणालाही धक्का बसू शकतो. असाच काहीसा धक्का या मंडळींना बसलेला दिसतो आहे. अज्ञात व्यक्ती लागाचा व्हिडीओ शूट करत असते. अचानक मंडपाच्या डाव्या बाजूला उभे असलेले लोक छत कोसळल्याने थेट खाली पडतात. टेरेसवरून पडल्यावर ते एमकेकांच्या अंगावर पडले. पण, कोणत्याही व्यक्तीला इजा झाली नाही असे दिसून येते आहे. एकदा बघाच अंगावर काटा आणणारा व्हायरल व्हिडीओ…
व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा…
https://www.instagram.com/p/DKtl21LIBLO
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ankit_.000__ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. एवढी भयानक घटना घडली तरीही नेटकरी या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. एक म्हणतोय की, ” कॅमेरामॅनला कधीच दुखापत होत नाही”, ” कॅमेरामॅन नाही याला लकी मॅन म्हणतात” , ” नशीब मंडप टेरेसच्या मधोमध बांधला होता, नाहीतर नवरा-नवरी सुद्धा खाली पडले असते” ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत…