Funny video: सोशल मीडियावर दररोज नवे-नवे व्हिडीओ दिसतात, पण काही व्हिडीओ असे असतात की ते पाहताच चेहऱ्यावर हसू येतं. असाच एका शाळेतील दोन छोट्या मुलांचा व्हिडीओ सध्या जोरात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही मुलांनी घातलेल्या अंगठ्यांमुळे वर्गामध्ये हास्य पसरलं आहे. त्यांची गोड निरागस उत्तरं, आत्मविश्वास आणि बोलण्याची शैली पाहून सरही गोंधळून जातात. या सगळ्या गमती-जमतींमुळे हा व्हिडीओ लोकांच्या मनात खास जागा बनवतो आणि पाहणारे हसू थांबवूच शकत नाहीत.

हा व्हिडीओ एका वर्गामधला आहे. शिक्षक नेहमीसारखे धडा शिकवत असताना त्यांची नजर एका मुलाच्या बोटातील चमकणाऱ्या अंगठीवर जाते आणि इथूनच मजा सुरू होते. अंगठी कितीची आहे हा विषय निघताच सगळं वातावरणच मजेदार बनतं. त्यातच बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या मुलाची “ही ५० रुपयांची अंगठी आहे, ५० कोटीची नाही” अशी केलेली घाईघाईची सफाई पाहून सगळेच हसू लागतात. संपूर्ण परिस्थिती इतकी गमतीशीर आहे की पाहणारेही पोट धरून हसले.

व्हिडीओमध्ये शिक्षक मुलांशी गप्पा मारत असताना अचानक एका मुलाच्या बोटातील मोठी, चमकणारी अंगठी दिसते. शिक्षक मजेत विचारतात, “ही अंगठी कुणाची?” मुलगा निरागस चेहऱ्याने म्हणतो, “माझीच आहे सर!” शिक्षक गंमत म्हणून विचारतात, “कितीची घेतली?” त्यावर मुलगा लहानपणीचा आत्मविश्वास दाखवत म्हणतो, “१० कोटीची!”

हे ऐकताच शिक्षक थोडे गोंधळले, पण त्यांनीही मजा चालू ठेवली. ते विचारतात, “अरे वा! १० कोटीची? कुठून घेतली ही?” मुलगा अजून आत्मविश्वासाने म्हणतो, “कल्याण शरीफमधून घेतली!” शाळेत इतकी महाग अंगठी आणू नये म्हणून शिक्षक म्हणतात, “चल, मला दे; सायंकाळी परत घेऊन जा.” हे ऐकताच मुलगा रडवेला चेहरा करत म्हणतो, “सर, प्लीज… उद्यापासून आणणार नाही.” त्याची ही गोड विनवणी कुणालाही हसू आणि माया दोन्ही आणते.

पाहा व्हिडिओ

मग शिक्षकांची नजर दुसऱ्या मुलाकडे जाते. त्याच्या हातातही एक छोटी अंगठी दिसते. तो घाबरून म्हणतो, “ही ५० ची आहे.” शिक्षकांना वाटतं की तो ‘५० कोटी’ म्हणतोय, म्हणून ते विचारतात, “५० कोटीची?” हे ऐकताच मुलगा पटकन म्हणतो, “नाही नाही सर, ५० रुपयांची आहे!”

या व्हिडीओखाली लोकांनी खूप मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी म्हणतंय, “ही दोन्ही मुलं भविष्यात नक्की मोठे बिझनेसमन होतील!” तर दुसऱ्याने म्हटलं , “१० कोटीची अंगठी घेऊन येणारा कॉन्फिडन्स मला द्या देवा!” तर काही जण शिक्षकांच्या संयम आणि मजेशीर वागण्याचं कौतुक करत आहेत. अनेकांनी मुलांच्या निरागस चेहऱ्यांचे स्क्रीनशॉट्स टाकून लिहिलंय, “अशीच पिल्लं आनंद देतात.” लोकांना या व्हिडीओने केवळ हसू दिलं नाही, तर बालपणाची आठवणही करून दिली. अंगठी खरंच १० कोटीची असेल का? कदाचित नाही… पण, त्या मुलांचं लाख मोलाचं हसू मात्र लोकांच्या मनात कायमचं कोरलं गेलं आहे!