Leopard jumped on moving car: बिबट्या हा अत्यंत घातक शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. गर्द झाडीमध्येही तो अचूक हल्ला करण्याची क्षमता ठेवतो. भक्ष्य कितीही उंचावर असलं तरी देखील तो अगदी सहज गतीनं उड्या मारत वर चढतो. असा खतरनाक प्राणी जर मानवी वस्तीत घुसला तर काय होईल? होय, असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. एका पिसळलेल्या बिबट्यानं तब्बल १३ लोकांवर हल्ला केला. समोर येणाऱ्या प्रत्येकाला हा बिबट्या जखमी करतोय. अगदी रस्त्यावर पळणाऱ्या गाड्यांवर देखील तो चढतोय. हा थरारक व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्कच व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजकाल धोकादायक प्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे जास्त प्रमाणात दिसून येत आहे. रात्री, दिवसा, कोणत्याही वेळी ते बेधडकपणे येऊन लोकांवर, प्राण्यांवर हल्ले करताना दिसत आहे. त्यांच्या भितीपोटी अनेक नागरिकांनी आपल्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. दिवसेंदिवस प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. नुकतीच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये जनावरांवर हल्ला करणारा बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पिसाळलेल्या बिबट्याचा थरारक हल्ला

बिबट्या सुसाट वेगाने पळताना दिसत आहे. तो उडी मारून उंच भिंत ओलांडतो आणि नंतर रस्त्यावर चालत्या व्हॅनवर हल्ला करतो. तो त्याच्या जबड्याने ड्रायव्हरच्या बाजूच्या खिडकीवर हल्ला करतो. मग व्हॅनचा ड्रायव्हर ब्रेक लावतो, वाहन क्षणभर थांबतं. बिबट्याच्या अचानक हल्ल्यामुळे व्हॅनमधून प्रवास करणाऱ्या लोकांच्या किंकाळ्या ऐकू येतात. यानंतर चालक वेगात व्हॅन चालवत पुढे जातो. मात्र हेच जर व्हॅनची कात उघडी असती तर तो बिबट्या थेट गाडीमध्ये शिरला असता आणि हल्ला केला असता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पालकांनो लेकरांना सांभाळा! चिमुकल्याच्या हातात बॉम्बसारखा फुटला फुगा; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल

 गावासह शहरातही बिबट्या आणि इतर वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या अनेक सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्याने प्राळीव प्राण्यांवर हल्ला केल्याचे पाहायला मिळाले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral leopard jumped from a wall and attacked on moving car shocking video viral on social media srk