Viral Video: मुंबईकरांसाठी लोकल म्हणजे जीव की प्राण. दर दिवशी हजारो लोकं लोकलनी प्रवास करतात. लोकल हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. या मुंबई लोकल ट्रेनमधील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिला चक्क लोकल ट्रेनमध्ये लावणी करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
रेल्वेतून प्रवास करत असताना अनेक लोक डान्स, कला, रील्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ शूट करणं पसंत करत असतात. सोशल मीडियावर असे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
सार्वजनिक ठिकाणी रिल्स बनवून प्रसिद्ध होण्यासाठी हल्ली अनेकजण प्रयत्न करताना दिसतात. असाच प्रयत्न या महिलेने केला. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला चालू ट्रेनमध्ये ‘वाजले की बारा’ या मराठी लावणीवर नाचताना दिसतेय. तिची ही लावणी पाहून आसपास जमलेल्या महिला तिला प्रोत्साहन देताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
या व्हिडीओ इन्स्टग्रामवरील @dj_akya_official अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “या साठी लोकल ट्रेन मध्ये लेडीज साठी special डब्बा आहे” तर एका युजरने लिहिलेय, “काकू, जरा हळू नाचा” आणखी एका युजरने लिहिलेय, “नाद करता काय”
