Viral Video: सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे काही जिल्ह्यांना रेड अलर्ट, ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला होता. मुसळधारेमुळे पुणे, मुंबई, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर यांसारख्या काही जिल्ह्यांमधील अनेक भागांत पूरजन्य परिस्थिती उदभवली होती, तसेच अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. या सर्व परिस्थितीमुळे शाळा, ऑफिसलादेखील सुट्टी देण्यात आली होती. दरम्यान, या जोरदार पावसातही अनेक जण सोशल मीडियावर विविध मजेशीर रील्स, फोटो शेअर करीत होते. तसेच बरेच जण पावसाच्या पाण्यात पोहताना, मजा-मस्ती करतानाही दिसत होते. त्याशिवाय एक व्यक्ती पावसाला वैतागून त्याला विनवणी करताना दिसली होती; ज्याचा व्हिडीओ खूप चर्चेत आला होता. आता असाच एक फोटो व्हायरल होतोय; जो पाहून तुम्हीही कपाळावर हात मारून घ्याल.

काही दिवसांपूर्वी राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. काही ठिकाणी आता पावसाने उसंत घेतली असून, काही ठिकाणी तो अजूनही कोसळत आहे. पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतो; पण हाच पाऊस मोठ्या प्रमाणात पडायला लागला की शेतकऱ्यांचे नुकसानही होते. शेतात पाणी साठल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याच पावसाला वैतागून काही गावकऱ्यांनी एक पोस्टर लावलं आहे, जे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

नक्की काय आहे या पोस्टरमध्ये? (Viral Video)

व्हायरल होत असलेले हे पोस्टर एका गावात लावण्यात आले आहे. त्यामध्ये पाऊस पडतानाचा एक फोटो दाखवण्यात आला आहे. यावेळी एक व्यक्ती पावसाला हार घालताना दिसत असल्याचे चित्रदेखील या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच या पोस्टरमध्ये एका बाजूला “धन्यवाद! भाऊ आता बास करा, जमिनीत पाणी जिरलं का ते माहीत नाही; पण आमची मात्र जिरली!!! – गावकरी”, असे एका गावकऱ्याचे पावसाला उद्देशून काढलेले उद्गार दिसत आहेत.

हेही वाचा: ‘सुसेकी’, गाण्यावर चिमुकलीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @dj_kartik_09 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २८ हजारांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप चर्चेत आहे. दरम्यान, यापूर्वीदेखील सोशल मीडियावर अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते.