Video Boy’s engagement Ring Proposal Viral :अरेंज असो किंवा लव्ह मॅरेज विवाह म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्या सहजीवनाची नव्याने सुरुवात होणार असते. नव्याने होणारी सुरुवात साखरपुडा आणि लग्न या दोन्ही कार्यक्रमापासून होते. त्यामुळे हे दोन्ही कार्यक्रम अगदी खास पद्धतीने साजरे व्हावा असे त्या जोडप्याला वाटत असते. या दोन्ही कार्यक्रमादरम्यान नकळत जोडीदाराने आपल्यासाठी काही तरी खास केलं पाहिजे; जे आयुष्यभर आपल्या लक्षात राहील. पण, काही जण लाजाळू असतात आणि अशा गोष्टी करण्यात जास्त रस दाखवत नाहीत. तर आज सोशल मीडियावर अशाच एका जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
@my_d3stiny_ ने शेअर केलेल्या व्हिडीओ नुसार एका जोडप्याचा साखरपुड्याच्या कार्यक्रम सुरु असतो. स्टेजवर दोघेही उभे असतात आणि पहिल्यांदा मुलगी मुलाला अंगठी घालते. त्यानंतर मुलगा हातात अंगठी घेतो आणि मुलीकडे बघून “थोडी मागे हो” असे म्हणतो. तेव्हा मुलीला नक्की मुलगा असं का म्हणाला हे कळतच नाही. मग मुलगा पुन्हा एकदा म्हणतो. त्यानंतर मुलगी मागे होते आणि मुलगा अंगठी घालायला गुडघ्यावर बसतो आणि नकळत मुलीच्या चेहऱ्यावर हसू येते.
आपल्या जोडीदाराची मनापासून केलेली एक छोटीशी कृती चेहऱ्यावर नकळत आनंद देऊन जाते. दोघांचाही साखरपुड्याच्या क्षण आयुष्यभर लक्षात राहण्यासाठी या जोडीदाराने सुद्धा असेच काहीसे केले आणि गुडघ्यावर बसून अंगठी घालण्यासाठी मुलीला “थोडी मागे हो” असे म्हणाला आणि नकळत मुलीच्या चेहऱ्यावर आनंद देऊन गेला. त्यामुळे दोघेही अंगठी घालत्यानंतर एकमेकांना मिठी मारतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @my_d3stiny_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “ज्याप्रकारे तो थोडं मागे हो म्हणतो हे पाहून खरोखरचं खूप छान वाटले” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या जोडप्याने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. की, “आमचा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय यावर माझा विश्वासच बसत नाहीये! माझा नवरा माझी खूप काळजी घेतो, तो खूप लाजाळू आहे. पण, आमच्या लग्नाच्या दिवशी त्याने हे माझ्यासाठी केले हे पाहून खरोखरच मी आनंदी झाली” ; अशी कमेंट केली आहे.