Shocking video: तुम्ही सोशल मीडियावर अनेकदा लहान मुलांचे असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील किंवा त्यांना असं काही बोलताना ऐकलं असेल ज्याने तुम्ही भावूक झाला असाल. सोशल मीडियावर लहानग्यांच्या पराक्रमाचे अनेक व्हिडीओ फिरत असतात. आपण नेहमी म्हणत असतो ‘मुले देवाघरची फुले’ लहान मुलं किती निरागस असतात, मात्र कधी कधी मोठ्यांनाही लाजवेल असं काम लहान मुलं नकळत करुन जातात. बऱ्याच वेळा आपल्याला मुलांमध्ये देवाचे अस्तित्व जाणवते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये असेच काहीसे दिसले आहे.

बऱ्याचदा आपल्याला सहज प्रश्न पडतो की, देव असतो का? देवाचं अस्तित्व कसं शोधायचं. मात्र तरीही आपण देवावार विश्वास ठेवतो प्रार्थना करतो. सध्या समोर आलेला व्हिडीओही असाच काहीसा आहे. यामध्ये लिफ्टमध्ये अडकलेला चिमुकला असं काही करतो आणि त्यानंतर जे घडतं ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

निरागस, गोंडस आणि अगदी निर्मळ मनाची ही चिमुरडी अनेक वेळा असं काही तरी बोलतात किंवा करतात की आपण सगळे अवाक् होतो. यांच्यासाठी ना कोणी मोठा ना कोणी लहान, ना कुठली जात, श्रीमंत काय आणि गरीब काय यांच्यासाठी सगळं एक सारखं असतं. आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक लहान प्रथम काही सेकंदांसाठी आजूबाजूला पाहतो, नंतर घाबरण्याऐवजी, तो डोळे बंद करतो, हात जोडतो आणि प्रार्थना करू लागतो.काही क्षणांनंतर, लिफ्टचा दरवाजा अचानक उघडतो आणि तो मुलगा सुरक्षितपणे बाहेर येतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, लाखो लोक तो शेअर करत आहेत. लोक मुलाच्या निरागसतेचे आणि श्रद्धेचे कौतुक करत आहेत.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @HumanityChad नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही या चिमुकल्याचं कौतुक करत आहेत तर काही त्याच्या पालकांच्या संस्काराबद्दल प्रतिक्रिया देत आहेत.