पुणेरी पाट्यांची चर्चा तर जगभर होत असते. आजकाल कार आणि ट्रकवर लिहिलेल्या पाट्या देखील चर्चेत येत आहे. अनेकदा कार किंवा ट्रकवर असा संदेश लिहिलेला असतो जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अनेकदा अशा पाट्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात कधी या पाट्या लोकांना हसायला भाग पाडतात तर कधी विचार करण्यासाठी भाग पाडतात. सध्या अशाच एका कार मागे लिहिलेली पाटी चर्चेत आली आहे जी वाचून नेटकऱ्यांना हसू आवरणे अशक्य झाले आहे. तुम्हालाही उत्सुकता असेल कारमागे नक्की काय लिहिले आहे? चला तर मग जाणून घेऊ या

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सध्या कार मागे लिहिलेल्या संदेशाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हायरल व्हिडीओच्या दिसणारी कार MH13 म्हणजेच सोलापूरमधील आहे. कारच्या बोनेटवर लाल अक्षरात संदेश लिहिलेला दिसत आहे. सुरुवातीला “आपलेच गद्दार”, त्याच्या खाली उजव्या बाजूला लिहिले आहे की, जितके तुम्ही विरोधात तितकीच आम्ही विरोधात” तर डाव्या बाजूला लिहिले आहे की, सावकाश ये भावा, लोन अजून शिल्लक आहे, मालक गरीब आहे.” हे वाचून नेटकरी बुचकळ्यात पडले आहेत.

हेही वाचा –“सर्वात सुंदर Video!” वडील आणि मुलीचं सुंदर नातं पाहून डोळ्यात येईल पाणी, पाहा हृदयस्पर्शी क्षण

येथे पाहा Viral Video

हेही वाचा – झोमॅटो डिलिव्हरी बॉयने शिवीगाळ केल्याचा महिलेचा दावा; नेटकऱ्यांनी महिलेलाच केलं ट्रोल, पण का? जाणून घ्या नक्की काय घडलं?

Viral Videoवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

इंस्टाग्रामवर chakradhar_gade_4909 नावाच्या खात्यावरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एकाने कमेंट केली की, “MH13 सोलापूर नादच खुळा”
दुसऱ्याने उपहासात्मक टिका करत लिहिले की, “भावाला ट्रक घ्यायचा होता पण चुकून कार घेतली”
तिसऱ्याने लिहिले की, आमच्या सोलापूरच्या लोक जाईल तिथे मैदान मारतील, त्यांचा काही नेम नाही”
चौथ्याने लिहिले की,”ही कार पुण्यात पाहिले तेव्हा खूप हसलो होतो”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video car interesting quotes written on backside viral news in marathi snk