कॉलेजचा शेवटचा दिवस, ना जाणे उद्या कोण कुठे असेल. प्रत्येकाच्याच आयुष्यात हा नकोसा वाटणारा कॉलेजचा शेवटचा दिवस येतोच. एकत्र घालवलेले दिवस, मजा-मस्ती सगळं काही आठवत. हे कॉलेजचे दिवस पुन्हा आयुष्यात कधीच परत येणार नाही हे सगळ्यांनाच माहिती असतं त्यामुळे हा शेवट स्पेशल व्हावा असं सगळ्यांनाच वाटतं. ग्रॅज्युएशनच्या दिवशी अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन विद्यार्थी करतात. अशाच एका महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॉलेजचा शेवटचा दिवस, विद्यार्थी बेभान –

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका महाविद्यालयाचं वार्षिक स्नेहसंमेलन सुरु होतं.यावेळी सर्व विद्यार्थी जोरदार सेलिब्रेशन करत डान्स करताना दिसत आहेत. दरम्यान अचानक सिमेंटच्या स्लॅबवर नाचणाऱ्या एका विद्यार्थांचा गट स्टेज कोसळल्यामुळे खड्ड्यात पडतो. स्लॅब कोसळल्यामुळे खाली एक मोठा खड्डा पडतो. सुदैवानं यात कोणीही गंभीर जखमी झाले नसून विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – Viral video: अचानक आलेल्या बिबट्यानं व्यक्तीला मारली मिठी; अन् पुढे जे घडलं…

या व्हिडीओला आतापर्यंत ८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेक प्रतिक्रिया यावर येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video dance floor falls at a graduation celebration swallowing 25 students srk