Viral Video: हल्लीचे तरुण-तरुणी गाडी चालवताना रील्स काढणे, डान्स करणे, ट्रेनमध्ये जीवघेणे स्टंट करणे, बाईक चालवताना इतर गाड्यांना मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न करणे अशा अनेक गोष्टी करताना दिसतात. पण, अनेकदा या हलगर्जीपणामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागतो. त्यांच्या या स्टंटचे व्हिडीओ पाहिल्यावर अनेक नेटकरी संताप व्यक्त करतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’, असं म्हटलं जातं. कारण- आईची पोकळी आयुष्यात कोणीच भरून काढू शकत नाही. आई तिच्या मुलांवर खूप प्रेम करते, त्यांना माया लावते. त्यांना ती स्वत:पेक्षा जास्त जपते. स्वत: हालअपेष्टा सहन करून, त्यांना लहानाचं मोठं करते. त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांचे सर्व हट्ट पूर्ण करता यावेत यासाठी ती दिवस-रात्र झटते. कधी कधी हीच आई योग्य वेळ आल्यावर तिचा रागही व्यक्त करते. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतूनही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी ट्रेनमध्ये तिच्या कुटुंबासह प्रवास करीत आहे. दरम्यान, ती ट्रेनच्या दरवाजाजवळ उभी राहून जीवघेणा स्टंट करतेय. तिच्या या जीवघेण्या स्टंटवर जेव्हा तिच्या आईची नजर पडते तेव्हा ती लेकीला ट्रेनमध्येच बेदम चोप देते. या व्हिडीओवरून लक्षात येतेय की, आई ही आईच असते. आपली मुलं चुकीच्या गोष्टी करीत असतील, तर ती त्यांना वेळीच सावरते.

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @real_funny_adi या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक नेटकरी कमेंट्स करीत आहेत. एकानं लिहिलंय, “ज्यानं हात पकडला आहे, त्याला पहिले हाना…”, तर दुसऱ्यानं लिहिलंय, “अजून २ लावा कानाखाली”, तर आणखी एकानं लिहिलंय, “माझ्याकडूनपण चार द्या”.