दिवाळी हा सण फक्त भारतातच नाही, तर जगभरात राहणाऱ्या भारतीयांसाठी खूप खास असतो. यंदा दुबईमध्येही दिवाळीचे जबरदस्त वातावरण दिसत आहे. रस्ते, इमारती आणि अपार्टमेंट्स दिव्यांनी उजळल्याचे दिसत आहे. दुबईत राहणाऱ्या भारतीयांनी हा सण खूप आनंदात साजरा केला असून, त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
दुबईत राहणाऱ्या निकिता पँचोली नावाच्या मुलीने आपल्या इन्स्टाग्रामवरून एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. तिने कारमध्ये बसून दुबईचे रात्रीचे दृश्य शूट केले आहे. त्या व्हिडीओमध्ये अनेक इमारती आणि घरे सुंदर लाईट्सनी सजलेली दिसतात. व्हिडीओमध्ये “दुबई दिवाळीसाठी सज्ज आहे”, असा मजकूरदेखील आहे.
व्हिडिओमध्ये जवळजवळ सगळ्या अपार्टमेंट्स आणि इमारतींच्या खिडक्यांवर रंगीबेरंगी दिवे लागलेले दिसतात. रस्त्यांवरही सणासारखं वातावरण जाणवतं. दिवे आणि सजावट पाहून असं वाटतं की, दुबईतील लोकही भारतीयांसोबत तितक्याच उत्साहानं दिवाळी साजरी करीत आहेत.
पाहा व्हिडिओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांना खूप आवडला आहे. अनेकांनी कमेंट्समध्ये आपला आनंद व्यक्त केला आहे. एका युजरनं लिहिलं, “सणांच्या वेळी खरंच घरची आठवण येते.” दुसऱ्या युजरनं तर तिचं घरचं ओळखलं आणि म्हणाली, “अरे, माझं घरही दिसतंय यात!” तिसऱ्यानं लिहिलं, “खूप सुंदर! दुबईकडून दिवाळीच्या शुभेच्छा.” आणखी एका व्यक्तीनं म्हटलं, “दुबई खरंच प्रत्येक संस्कृतीला मान देतं.”
हा व्हिडीओ फक्त दिवाळीची सजावट दाखवत नाही, तर एक सुंदर संदेशही देतो – दिवाळी हा सण केवळ भारतापुरता मर्यादित नाही. तो जिथे भारतीय आहेत, तिथे आनंदानं साजरा होतो आणि त्या आनंदात इतरही समुदाय सहभागी होतात. दुबईतील या प्रकाशमय सजावटीकडे पाहून असं स्पष्ट जाणवतं की, दिवाळी लोकांना एकत्र आणण्याची ताकद ठेवते. धर्म, भाषा किंवा देश काहीही असो – दिवाळी सण सगळ्यांना एकाच भावनेत जोडतो.
रंगीबेरंगी दिवे, सजवलेल्या इमारती आणि लोकांच्या आनंदी प्रतिक्रियांनी हा व्हिडीओ खऱ्या अर्थानं ग्लोबल दिवाळी कशी दिसते हे दाखवतो. हे दृश्य पाहताना कोणाच्याही मनात आपोआपच आनंदाची भावना निर्माण होते आणि आपल्याला असं वाटतं की, आपण सर्व जण एका मोठ्या कुटुंबाचा हिस्सा आहोत.