Elephant Saved From Water Tank Viral Video : जंगलातील प्राणी आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टी निराळ्या असतात. आपल्या सारख्या त्यांच्याही जीवनात दररोज हृदयस्पर्शी गोष्टी घडत असतात. शिकारीदरम्यान कुटुंबातील व्यक्तींना गमावतात, नकळत भटकंतीदरम्यान एखाद्या संकटात सापडतात आणि मग बचाव पथक यांना आधार द्यायला घटनास्थळी पोहचवतात. तर याचसंबंधित माहिती अनेक आयएएस आणि आयएफएस अधिकारी त्यांच्या पोस्टमधून देत असतात. आज आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी एका हत्तीची गोष्ट त्यांच्या पोस्टमधून सांगितली आहे.
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी सुप्रिया साहू यांनी तमिळनाडू वन विभागाच्या पथकाने पाण्याच्या टाकीत पडलेल्या हत्तीणीला वाचवतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये हत्तीण एका पाण्याच्या टाकीमध्ये अडकलेली दिसते आहे. ही गोष्ट समजताच बचाव पथकाने घटना स्थळी धाव घेली. हत्तीणीला सोडण्यासाठी पाण्याची टाकी उघडली आणि काही क्षणातच हत्ती जंगलात सुरक्षितपणे परतला आहे; जे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू नक्कीच येईल.
वन विभागाने वाचवलं हत्तीणीला (Viral Video)
निलगिरीच्या कुन्नूर येथील आदिवासी गावात ही घटना घडली आहे. हत्तीण पाण्याच्या टाकीत पडताच डीएफओ ऊटी, रेंज ऑफिसर कुन्नूर आणि संपूर्ण टीमने हत्तीणीला वाचवण्यासाठी धाव घेतली आणि सुखरूप जंगलात जाण्यासाठी बचावकार्य सुरु केले. एका युजरने केलेल्या कमेंट नुसार केरळमध्ये आता ही गोष्ट सामान्य झाली आहे. जंगलातील हे बिचारे प्राणी शेतीसाठी बेकायदेशीरपणे घेतलेल्या जंगल-जमिनीवर असलेल्या विहिरी, पाण्याच्या टाकीत पडतात. त्यांना वाचवायला वनविभाग येतो तेव्हा गावकरी अडथळा निर्माण करतात आणि लाखोंची मागणी करतात. आधी जंगल बेकायदेशीरपणे व्यापून घ्यायचं आणि प्राणी आत शिरले म्हणून तक्रार करतात.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ @supriyasahuias या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये “निलगिरीच्या कुन्नूर येथील आदिवासी गावात पाण्याच्या टाकीत पडलेल्या मादी हत्तीणीला तमिळ वन विभागाच्या जलद कारवाईने वाचवले. टाकी उघडली आणि हत्तीण सुरक्षितपणे जंगलात परतली. वेळेवर बचाव केल्याबद्दल डीएफओ ऊटी, रेंज ऑफिसर कुन्नूर आणि संपूर्ण टीमचे कौतुक” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.