Viral Video Ex Army Officer Handwritten Love Letter : एक कागद, शाई आणि प्रेमाने लिहिलेल्या त्या ओळी यांनी लिहिलेल्या पत्रातील भावना कदाचित नवीन पिढीला कधीच अनुभवायला मिळणार नाहीत. एक सेकंद रिप्लाय द्यायला उशीर झाल्यावर रागावणारी मंडळी पत्रासाठी १५ ते २० दिवस वाट बघू शकली असती का, याबद्दलच विचार करूनच नवल वाटते. पण, ही पत्र कशी कशी लिहिली जायची, एका पत्रात सगळ्या भावना कशा मांडल्या जायच्या याबद्दल आपल्या सगळ्यांच्याच मनात नेहमीच उत्सुकता असते. तर आज आपल्या सगळ्यांनाच त्याचे प्रात्यक्षिक बघायला मिळेल.

कॅप्टन धर्मवीर सिंह यांनी इन्स्टाग्रामवर १० डिसेंबर २००१ रोजी लिहिलेल्या एका पत्राचा व्हिडीओ शेअर केला आहे. तेव्हा कॅप्टन धर्मवीर सिंह चेन्नईतील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये नुकतेच सामील झाले होते. व्हिडीओतील पत्र त्यांना त्यांच्या प्रेयसीकडून मिळाले होते, जी आता त्यांची पत्नी आहे आणि लाडाने ते तिला ‘ठकुराईन’ असे म्हणतात. पण, घरच्यांकडून आलेली पत्रे त्यांना सहज दिली जायची का? तर नाही… त्या काळी शिक्षा म्हणून १०० ते ५०० पुश-अप्स केल्यानंतर वरिष्ठ कॅडेट्स त्यांच्या हातात पत्र द्यायचे.

काही नाती पत्रांमधून कायम जिवंत राहतात… (Viral Video)

पत्र जितके मोठे असेल तितकीच मोठी शिक्षा असायची. कॅप्टन धर्मवीर सिंह यांच पत्र खूप मोठे म्हणजे आठ पानांचे असल्यामुळे ही पुश-अप्सची संख्या ५०० पर्यंत वाढली. मग काय ब्रेक घेत, मधेच थांबत अखेर दोन तासांत त्यांची ही शिक्षा पूर्ण झाली. हे पत्र व्हिडीओत दाखवल्यामुळे व्यवस्थित वाचता येणार नाही. पण, पत्र पाहूनच तुम्हाला नकळत भरून येईल. कॅप्टन धर्मवीर सिंह यांनी हा व्हिडीओ शेअर करीत म्हटले, “पत्र लिहिण्याचा तो काळ खूपच चांगला होता. जितक्या उत्साहानं पत्र लिहिली जात होती, तितक्याच दीर्घकाळ टिकणाऱ्या भावनाही त्यात होत्या”.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर @capt_dvs द्वारे व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्स भावूक झाले आहेत. एक युजर म्हणतेय “माझ्या पत्रांसाठी तुला शिक्षा होण्याची कल्पनाही मला आवडत नाही. हे लिहिलेलं पाहून माझं मन भरून आलं.” दुसरा म्हणतोय, “मला वाटतं माझ्यासारखे बरेच जण तुमचे पत्र वाचण्याचा प्रयत्न करतील. जर तुमच्याकडे आणखी असतील, तर आमच्याबरोबर नक्की शेअर करा. सुंदर हस्ताक्षर, हृदयस्पर्शी प्रेमकथा तीही ५०० पुश अप्स किमतीची” आदी भावना तर अनेक युजर्ससह इंडिया पोस्टच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरूनसुद्धा “किती आश्चर्याची गोष्ट आहे ना? जुनी पत्रं आजही आपल्याशी संवाद साधत आहेत, अशी भावना देऊन जातात. म्हणूनच काही नाती पत्रांमधून कायम जिवंत राहतात” अशी कमेंट करण्यात आली आहे.