Viral Video Family Organise Unique Kelvan : एखाद्या जवळच्या मैत्रिणीचं किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच लग्न ठरलं की, हमखास केळवणाची आमंत्रणे यायला सूर्यवंत होतात. यापूर्वी फक्त नवरीचे केळवण करण्याची पद्धत होती. मात्र आता लग्नाआधी नवरा नवरी दोघांनाही केळवणासाठी आवर्जून बोलावले जाते. या केळवणात वेगवेगळे चमचमीत पदार्थ, सुंदर सजावट आणि काही भेटवस्तू आवर्जून दिल्या जातात. जेणेकरून जोडप्याला हा दिवस आणखीन लक्षात राहावा. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
@varsha_katkar_ ने शेअर केलेल्या व्हिडीओनुसार नवरीचे केळवण आयोजित करण्यात आलेले असते. या केळवणात लाडक्या लेकीच्या आवडत्या गोष्टी आणि त्यात जबाबदाऱ्या यांची सांगड घालण्यात आली आहे. म्हणजेच घरातील प्रत्येक जण पहिला तिची आवडती वस्तू आणि लग्नानंतर त्याचे परिवर्तन कशात होणार याची जाणीव करून देतो आहे. म्हणजेच आधी एक लहान भाऊ तिच्या आवडीचा वनपीस घेऊन येतो. त्यानंतर दुसरी बहीण तिच्या हातातून वनपीस काढून घेते आणि तिच्या हातात साडी देते.
“ही कल्पना ज्याला सुचली,त्याला सलाम… ” (Viral Video)
नंतर दुसरा भाऊ मेकअपचे सामान तिच्या हातात देतो. त्यानंतर दुसरी बहीण येऊन तिच्या हातात लाटणं देते. त्यानंतर तिसरा भाऊ तिच्या स्कुटीची चावी घेऊन येतो. त्यानंतर तिसरी बहीण येऊन तिच्या हातात झाडू देते आणि मग नवरी मुलगी घरात प्रवेश करते. त्यानंतर जेवणासाठी वेगवेगळे पदार्थ नाही तर अगदी पोळी-भाजी, भात-डाळ असं साधं आणि रोजचं जेवण केळवणासाठी ठेवलं आहे; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. अनोखं केळवण तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @varsha_katkar_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये “असे ही एक केळवण” ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून “ही कल्पना ज्याला सुचली.. त्याला सलाम… काही तरी नाविन्य होत पण निखळ हसू आले चेहऱ्यावर”, “काहीतरी वेगळंच केळवण”, “मस्त केळवण” ,”खूप सुंदर केळवण”; आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.