Viral Video Father Fulfill Daughter’s Dream In Unique Style : वडिलांच्या प्रेमाला, समर्पणाला आणि त्यागाला मर्यादा नसतात. प्रत्येकाच्या आयुष्यातला आधारस्तंभ असणाऱ्या या बाबाशिवाय जीवन जगणे कठीण होऊन जाते. एखादी वस्तू महागडी असेल तर जाऊदेत नको घेऊया असे म्हणून आपण माघार घेतो. पण, हीच गोष्ट मुलांना, बायकोला आवडली म्हणून कशाचाही विचार न करता बाबा लगेच पैसे पुढे करतात. तर आज असेच काहीसे दाखवणारा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

व्हायरल व्हिडीओ छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातील आहे. बजरंग राम भगत या शेतकऱ्याने लेकीला स्कूटर भेट म्हणून देण्यासाठी जीवाचे रान केले आहे. शेतकऱ्याने ६ महिन्यांत ४०,००० रुपयांची नाणी जमा करून ठेवली. मग ६ महिन्यानंतर तीच नाणी घेऊन आपल्या लेकीला स्कुटर घेऊन देण्यासाठी शो रूममध्ये गेला. हे दृश्य पाहिल्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर नकळत आनंद आला.

४० हजार रुपयांची नाणी (Viral Video)

शेतकरी लेकीची स्कूटर घेण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी नाण्यांनी भरलेली बॅग घेऊन शोरूममध्ये येतो. शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी नाणी टेबलावर ठेवून तुम्ही मोजण्यास सुरुवात केली. टेबल नाण्यांच्या ढिगाऱ्याने भरलेला दिसतो आहे. नाणी मोजून झाल्यावर वडील गाडी खरेदी करतात आणि मुलगी आनंदाने टाळ्या वाजवताना दिसते आहे. कुटुंबाला स्कूटरच्या चाव्या मिळाल्या. याव्यतिरिक्त, प्रमोशनल ऑफरचा भाग म्हणून, त्यांना वाहन मिक्सर ग्राइंडर देखील देण्यात आला.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @vishnukant_7 या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये “बजरंग राम भगत यांनी ४० हजार रुपयांची नाणी जमा केली आणि त्यांच्या मुलीला स्कूटी भेट दिली” ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी बाबा आणि लेकीच्या या खास क्षणाचे वर्णन, वडिलांचे मुलीवरील प्रेम आणि मुलांच्या इच्छेसाठी वडिलांच्या कठोर परिश्रमाबद्दल अनेक कमेंट्स केलेल्या दिसत आहेत.