Viral Video: डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच; पण मनही शांत होते. मुलीही अनेकदा एकत्र आल्या की, एखाद्या गाण्यावर डान्स सादर करून दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही तुम्हाला असंच काहीतरी पाहायला मिळेल.

सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये चार तरूणी अतिशय सुरेख असा डान्स करताना दिसत आहे. हा डान्सचा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. तुम्ही आजवर अनेक डान्स व्हिडीओ पाहिले असेल पण या तरुणाने सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चार तरूणी निसर्गरम्य परिसरामध्ये पारंपारिक मराठमोळ्या लूकमध्ये डान्स करताना दिसत आहेत. यावेळी त्या चौघी “काल स्वप्नामधी माझा सजना”, या मराठी जुन्या गाण्यावर अतिशय सुरेख डान्स करत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @creation_dance_studio अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत सहा लाखाहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “तुम्ही सगळे खूप सुंदर आहात आणि तुमचा डान्स सुद्धा खूप छान आहे आणि तुमचा व्हिडिओ खूप चांगला आहे” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “याला म्हणतात स्वच्छंद मनमुराद जगणं” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “खूप मस्त डान्स पोरींनो” आणखी एकानं कमेंटमध्ये लिहिलंय, “तुमचा डान्स लय भारी आहे.”