Viral Video: हल्लीचे तरुण-तरुणी कधी कुठे काय करतील हे सांगता येत नाही. फक्त प्रसिद्धीसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून कुठेही रील्स काढणे, डान्स करणे, जीवघेणे स्टंटचे व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकणे, इतर गाड्यांना मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न करणे; अशा अनेक गोष्टी करताना दिसतात. पण, अनेकदा या हलगर्जीपणामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी पायऱ्यांवर जीवघेणा स्टंट करताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समाजमाध्यमांवर विविध व्हायरल व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात, ज्यातील काही व्हिडीओंमुळे आपले मनोरंजन होते तर काही व्हिडीओंमुळे आपल्या अंगावर काटा येतो. अशा प्रकारचा व्हिडीओ समोर येताच काही क्षणांत लाखो व्ह्यूज आणि लाइक्स मिळवतात. दरम्यान, आता या तरुणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ परदेशातील असून यामध्ये काही जण एका रस्त्याच्या बाजूच्या कठड्यावर बसलेले दिसत आहेत. त्यावेळी एक तरुणी स्केटबोर्ड चालवत येते आणि खाली असलेल्या पायऱ्यांवरून उडी मारण्याचा प्रयत्न करते. पण, अचानक स्केटबोर्डवरून तिचा पाय घसरतो आणि ती उंचावरून खाली जोरात आपटते. यावेळी तिच्या डोक्याला आणि कंबरेला दुखापत झाल्याचे दिसत आहे.

हा व्हिडीओ x(ट्विटर)वरील @Govind Jamre या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये, “दीदीला उड्या मारणं महागात पडलं, तिची हाडं मोडली”; असं म्हटलं आहे. यावर आतापर्यंत अनेक लाइक्स आणि व्ह्यूजही मिळाल्या आहेत. तसेच यावर युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

हेही वाचा: अरे बापरे! बसमध्ये चढण्यासाठी महिलेची दादागिरी; VIDEO पाहून कपाळावर माराल हात

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने लिहिलंय की, “अरे ही मोडली”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “कॅमेरामन ती पडली तरी शूट करतोय”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “अरे व्वा, हिला असंच पाहिजे”, तर चौथ्या युजरने लिहिलंय की, “दीदी तर गेली, आता काय होईल.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video girl jumping high from a skateboard video goes viral on social media sap