Goa Old Monk Viral Video: ३१ डिसेंबरच्या काहीच आठवड्याआधी अलीकडेच गोव्यात समुद्रकिनारी दारू पिण्यास बंदी घालण्यात आली आहे. मद्यपान करणाऱ्यांना दंड ठोठावला जाईल अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. अशातच अर्थातच अनेक मद्यप्रेमींची निराशा झाली होती. पण आता नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ मात्र मद्यप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. आजवर खाण्याचे भन्नाट प्रयोग तुम्ही सोशल मीडियावर खूपदा पाहिले असतील. बहुतांश वेळा या व्हिडीओजमधून आपली निराशाच होते. कुठे रसगुल्ला मॅगी, केचप टाकून मिठाई आणि तुम्हाला वाचायला व आम्हाला सांगायला त्रास होतील असे अनेक पदार्थ व्हायरल होत असतात, यावेळेस मात्र एका स्ट्रीट शेफने हटके कॉम्बो जुळवून आणला आहे, आणि तो म्हणजे ओल्ड मॉंक चहा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोव्याच्या किनाऱ्यावरून व्हायरल होणारा व्हिडीओ ट्विटरवर @DrVW30 या हॅन्डलवरून शेअर करण्यात आला होता. तुम्ही जर तंदुरी चहा हा प्रकार ओळखून असाल तर जवळपास त्याच पद्धतीने हा ओल्ड मॉंक चहा सुद्धा बनवला जातो. तशी या चहाची रेसिपी साधी सोप्पीच दिसत आहे हा व्हायरल शेफ आधी पाण्यात गुळाची पावडर व चहा पावडर टाकून उकळवून घेतो व मग त्यात ओल्ड मॉंक ओतून फायनल टच देतो, हा तयार चहा मातीच्या कुल्लड मधून सर्व्ह केला जातो.

Video: रडणाऱ्या नवरीची फरफटत पाठवणी; माहेरच्यांनी पाय धरून भर मंडपातून..

गोव्याच्या किनारी ओल्ड मॉंक चहा

Video: होम मिनिस्टरमध्ये आजींचा रॅम्प वॉक झाला Viral; ‘फ्लायिंग किस’ पोझ द्यायला गेल्या अन पार..

दरम्यान ओल्ड मॉंक चहाच्या या व्हिडिओला आतापर्यंत २८ हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर ६८४ लाईक्स आहेत. अनेक मद्यप्रेमींनी या रेसिपीला ट्राय करण्यासाठी गोव्याला जाण्याची इच्छा कमेंटमध्ये व्यक्त केली आहे. तर काहींनी या प्रकारची निंदाही केली आहे, तुमच्यामुळे गोव्याचे नाव केवळ दारूसाठी ओळखले जाते असेही अनेकांनी म्हंटले आहे.

(वरील लेख हा माहितीपर आहे यातून मद्यपानास प्रोत्साहन देण्याचा हेतू नाही)

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video goa old monk tea vendor stuns netizens with tandoori recipe watch reaction svs