Viral Video Unlocking Car With Phone : सध्या लहान मुलांचे सर्वांत आवडते खेळणे म्हणजे मोबाइल फोन आहे. पूर्वी आईवडिलांच्या पिशवीत आपण खाऊ शोधत राहायचो. पण, आता मुले फोन शोधू लागतात. यावरूनच त्यांना मोबाईलचे किती वेड आहे हे आपण समजू शकतो. ण, आपण चिमुकल्यांसमोर मोबाईलचा वापर चांगल्या गोष्टींसाठी केला तर कदाचित चित्र बदलूही शकते. आज असेच काहीसे व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळाले आहे. मुलांना सवय लावणाऱ्या या मोबाईलनेच आज चिमुकलीचा सुखरूप बाहेर काढले आहे.

तेलंगणातील पेड्डापल्ली जिल्ह्यातील सुलतानाबाद येथील एका मिठाईच्या दुकानाबाहेर एक घटना घडली. बाबा कारमधून बाहेर निघाले आणि सवयीप्रमाणे त्यांनी दरवाजा चुकून बंद केलं. मग काय त्यांच्याबरोबर असणारी चिमुकली चुकून गाडीतच राहिली. गाडी लॉक झाली आणि चाव्या सुद्धा आतमध्येच राहिल्या. आजूबाजूची मंडळी देखील मदतीसाठी धावून आली आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण, सगळेच प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यानंतर एका माणसाला एक भन्नाट कल्पना सुचली.

एका तरुणाने अज्ञात तरुणाने त्याच्या मोबाईल फोनचा वापर करून, आतून कार कशी अनलॉक करायची हे दाखवणारा व्हिडीओ शोधून काढला. मुलीला व्हिडीओ दाखवल्याप्रमाणे एकेक स्टेप्स फॉलो करायला सांगितल्या. मुलीने दाखवलेल्या पायऱ्या कॉपी केल्या आणि आतून यशस्वीरित्या लॉक उघडले, त्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला. मुलगी सुरक्षितपणे बाहेर पडताच सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि लेकीने बाबांना मिठी मारली. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा बघाच…

व्हिडीओ बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @NewsMeter_In या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. लीने दाखवलेल्या पायऱ्या कॉपी केल्या आणि आतून यशस्वीरित्या कुलूप उघडले, त्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला. मुलगी सुरक्षितपणे बाहेर पडताच सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि योग्य वेळी उपाय शोधल्याबद्दल त्याचे कौतुक केले. व्हिडीओ पाहून एका नेटकाऱ्याने सुद्धा “फोनवर बंदी घालण्यापेक्षा मुलांना योग्य वापराबद्दल मार्गदर्शन करा म्हणजे आपत्कालीन परिस्थिती समस्या सोडवणे असे सोपे जाते” ; अशी कमेंट केली आहे…