Viral Video: या जगात असा एकही व्यक्ती नसेल ज्याचा एकही मित्र नाही. मैत्री हे एक असे नाते आहे जे रक्ताचे नाते नसले तरी त्यात प्रेम आणि आपुलकी असते. अनेकदा मैत्रीचे नाते रक्ताच्या नात्यांपेक्षा खूप घट्ट असते. मग ती मैत्री माणसांची असो किंवा प्राण्यांची, या नात्यामध्ये नेहमीच आपलेपणा पाहायला मिळतो. सध्या असाच एक सुंदर व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात एक कुत्रा आणि माकडाची मैत्री पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियामुळे सतत नवनवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात; ज्यामध्ये अनेकदा जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओदेखील व्हायरल होतात. त्यामध्ये कधी वाघ, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात. तर, काही प्राण्यांमध्ये भांडण वा मैत्री पाहायला मिळते. प्राण्यांचे असे व्हिडीओ नेहमीच युजर्सचे लक्ष वेधून घेतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; जो पाहून तुम्हीदेखील आश्चर्य वाटेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घराच्या गच्चीवर एक कुत्रा मागच्या दोन पायांवर उभा राहून शेजारील घराच्या गच्चीवरील माकडांकडे पाहत आहे. यावेळी कुत्र्याला पाहून त्यातील एक माकड कुत्र्याजवळ येते आणि त्याच्याकडे पाहून त्याला कुरवाळते, तसेच त्याला मिठी देखील मारते. कुत्रा आणि माकडाचे हे प्रेम पाहून युजर्सही अवाक झाले आहेत. कारण आतापर्यंत बऱ्याचदा माकडांना पाहून कुत्र्याला नेहमी भुंकताना पाहिलं आहे. या व्हिडीओतील या दोघांचे प्रेम पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे.

हेही वाचा: तिच्यासाठी काहीपण! भररस्त्यात खाली बसून आजोबांनी काढले आजीचे फोटो… VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @adorable.monkey या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास पाच मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि तीन लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर एका युजरने लिहिलंय की, “व्वा काय मैत्री आहे”. तर आणखी एकाने लिहिलंय की, “मला हा कुत्रा खूप आवडला”, तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “या माकडालापण कुत्रा आवडला वाटतं”