Viral Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अनेकदा या व्हायरल व्हिडीओंमुळे आपले खूप मनोरंजन होते. सध्या सोशल मीडियावर विविध गाणी मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आपण पाहतो, ज्यात नवीन गाण्यांपासून ते जुन्या गाण्यांपर्यंत अनेक गाणी असतात. लोक त्यावर अनेक रिल्सही बनवतात. तसेच काही जण ही गाणी वेगळ्या पद्धतीने गाताना दिसतात, ज्याचे व्हिडीओदेखील खूप चर्चेत असतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल.

कलाकार शहरातील असो किंवा खेड्यातील, त्याची कला नेहमीच त्याला श्रेष्ठ बनवते. समाजात लाखो कलाकार आहेत, पण कलाकाराच्या कलेतील वेगळेपणा नेहमीच प्रेक्षकांना भावतो. असे कलाकार खूप लोकप्रिय होतात. एखादं गाणं लाखो लोक गातात, पण यात काही मोजके लोक असतात जे तेच गाणं वेगळ्या पद्धतीने गाण्याचा प्रयत्न करतात, हा वेगळेपणा नेहमीच लोकांना आवडतो. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका खेड्यातील वृद्ध व्यक्ती बॉलीवूडमधील एक रोमाँटिक गाणं देसी पद्धतीने गाताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक खेड्यातील वृद्ध व्यक्ती आपल्या ग्रुपसोबत एका कॉलेजच्या फंक्शनमध्ये हे गाणं सादर करताना दिसत आहे. या वेळी ती व्यक्ती सुरपेटी वाजवत, कॉलेजमधील हॉलमध्ये ‘दिल संभल जा जरा’ हे गाणं म्हणताना दिसतेय. या गाण्याची पहिली ओळ ऐकताच हॉलमध्ये शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट होतो. पुढे याच गाण्यावर त्यांच्यासोबत असलेला एक तरुण ढोलकी वाजवताना दिसत आहे. त्याच्या ढोलकीचा नाद ऐकून पुन्हा लोक शिट्ट्या वाजवतात. बॉलीवूडमधील या गाण्याचा देसी अंदाज सर्वांनाच आवडतो.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @prashant_takik_official या अकाउंटवर शेअर केला असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने, ‘आप्पांनी केला कॉलेजमध्ये राडा’ असं लिहिलं आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत जवळपास तीन मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर अडीच लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.

हेही वाचा: VIDEO : बापरे! युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये पुरुषाने महिलेला केली मारहाण; नेटकरी झाले संतप्त

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “व्वा, काय गाणं गायलं सुंदर”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “ढोलकीवाल्या दादाने मस्त सूर लावलाय”, तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “आप्पा जोमात, इम्रान हाश्मी कोमात”; तर आणखी एका व्यक्तीने गमतीमध्ये “हा माणूस नक्कीच तरुणपणात प्रेमात वेडा झाला असणार”, असं लिहिलं आहे.