Viral Video Men Sitting On Women Reserved Seat : रेल्वेगाड्यांची मर्यादित संख्या आणि दिवसेंदिवस वाढणारी प्रवासी संख्या यांमुळे प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळत नाही. त्यामुळे ट्रेन प्रवासादरम्यान व्यवस्थित सामान ठेवून बसायला मिळावे म्हणून कित्येक प्रवासी प्रवासाआधीच दोन महिने आरक्षित तिकीट काढून ठेवतात. वातानुकूल डब्यात सहसा कोणी चढत नाही; पण सामान्य डब्यात मात्र विनाआरक्षित प्रवाशांची जास्त गर्दी दिसून येते. एकीकडे त्यांची दयासुद्धा येते; तर दुसरीकडे आपण मात्र प्रवासाच्या तिकिटासाठी किंमत मोजली आहे हेसुद्धा आठवत राहते.
तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. अत्यावश्यक कामानिमित्त जाण्यासाठी काही प्रवासी प्रतीक्षा यादीतील तिकिटावर रेल्वेगाडीतून प्रवास करतात. परिणामी, आरक्षित तिकीटधारक प्रवाशांची प्रवासादरम्यान गैरसोय होते. याबाबत एका महिला प्रवाशाने प्रवास करताना काही व्हिडीओ शूट केले आणि तेथील परिस्थिती दाखवली आहे. एक अज्ञात प्रवासी तरुणीच्या स्लीपर क्लासच्या राखीव केलेल्या ‘मिडल बर्थ’ सीटच्या अगदी कडेला बसलेला दिसतो आहे. हे पाहून तरुणीने व्हिडीओ केला आणि प्रवासादरम्यानचे काही धक्कादायक खुलासे केले.
तिच्या शेजारी झोपण्याचा केला प्रयत्न (Viral Video)
तरुणीने व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे लांबच्या पल्ल्याचा रेल्वे प्रवास कसा असतो याबद्दल तिला कल्पना होती. म्हणून मागील वाराणसी प्रवासादरम्यान धडा घेऊन तिने यावेळी प्रवासासाठी सीट बुक केली. गर्दी असूनही ती प्रत्येक गोष्टीशी जुळवून घेत होती. पण, पहाटे ४ वाजता गाढ झोपेत असताना जेव्हा अज्ञात माणसाने हळूहळू तिच्या शेजारी झोपण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र तिचा राग अनावर झाल, ती अस्वस्थ झाली. एवढेच नाही, तर काही पुरुष विचित्र पद्धतीने पाहतात, तर काही चांगले वागतात. पण, कोणीही इतर प्रवाशांच्या अस्वस्थतेचा विचार करीत नाही. त्यामुळे ही वागणूक अत्यंत चिंताजनक आहे; असे तिने व्हिडीओत म्हंटले आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @nehaaaa_8_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी तरुणीची परिस्थिती समजून न घेता, “ट्रेनची साखळी ओढा आणि अधिकाऱ्यांशी वाद घाला. त्यांना सांगा की, ??? ट्रेन डब्यातील प्रवाशांना खाली उतरवत नाहीत (की- ट्रेनच्या आरक्षित डब्यातील विनाआरक्षण असलेल्या प्रवाशांना खाली उतरवले जात नाही)??? तोपर्यंत तुम्ही साखळी ओढणे थांबवणार नाही”, “सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे एसी कोचचे तिकीट बुक करा” असे पर्याय सुचवतात. तर काही जण, तरुणीची बाजू समजून घेऊन “@ashwini.vaishnaw, हे का घडत आहे”, “@indian_railways_officel ही काय परिस्थिती आहे”, असे प्रश्न रेल्वेमंत्री आणि रेल्वे प्रशासनाला विचारताना दिसत आहेत.