Viral Video Elephant Calf First Steps : जन्मलेले बाळ जसजसे मोठे होत जाते तसतसे आई-वडील त्याचा आवाज ऐकण्यासाठी, त्याला बोलताना पाहण्यासाठी आणि खासकरून त्याला चालताना पाहण्यासाठी उत्सुक असतात. त्याने पहिल्यांदा उचललेले पहिले पाऊल रेकॉर्ड करण्यासाठी आई-बाबांची धडपड सुरू असते. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, जंगलातील प्राण्यांची पिल्ले जन्मल्यानंतर किती दिवसांनी किंवा किती तासांनी चालायला लागत असतील? तर आज त्याचीच माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे.
भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी परवीन कासवान अनेकदा वन्यजीवांबद्दल नियमित वेगवेगळे अपडेट्स देत असतात. अलीकडेच त्यांनी हत्तीण आणि तिच्या पिल्लाचा एक मोहक व्हिडीओ शेअर केला आहे, जो आता अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. हत्तीण आणि तिचे नुकतेच जन्मलेले पिल्लू रस्त्यावर जंगलाच्या दिशेने जाताना दिसत आहे. नवजात हत्तीच्या पिल्लाचे पहिले अस्थिर पाऊल पडताना परवीन कासवान यांनी पाहिले आणि व्हिडीओ शेअर करून खास माहितीसुद्धा दिली आहे.
निसर्ग आणि त्याची निर्मिती (Viral Video)
परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर करीत त्यांनी “नवजात हत्तीच्या पिल्लाची पावले. जन्माला आल्यावर हत्तीच्या पिल्लाची चाल स्थिर नसते. चालताना ते इकडे-तिकडे डगमगते. हत्तिणीचे पिल्लू जन्मानंतर साधारण एक ते दोन तासांनी चालायला लागते. कारण- जंगलात राहण्यासाठी त्यांना लगेच आईबरोबर फिरता यायला हवे, त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची असते”, असे या क्षणाचे वर्णन करत त्यांनी म्हटले आहे. एकदा बघाच सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ…
व्हिडीओ बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ParveenKaswan या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून “किती हृदयस्पर्शी क्षण! त्या लहान पिल्लाची पहिली पावले निसर्गाची परिपूर्ण वेळ दर्शवते”, “निसर्गाचा चमत्कार”, “निसर्ग आणि त्याची निर्मिती अद्भुत आहे” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.