आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर रोज काही ना काही हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण, काही व्हिडीओ असे असतात जे थेट मनाला भिडतात आणि माणुसकी म्हणजे नेमकं काय, हे नव्याने समजून देतात. अलीकडेच असा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका कुत्र्याने त्याच्या वृद्ध मालकाला मदत करताना दाखवलेल्या करुणेने लोक भारावून जातात. हा व्हिडीओ पाहताना कोणाच्याही डोळ्यांत पाणी येईल, इतका तो हळवा आणि मनाला भिडणारा आहे.
या व्हिडीओमध्ये दिसते की, एक वृद्ध महिला हाताने ओढायच्या हातगाडीवर काही बोर्या ठेवून नेण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या हातगाडीवर जड सामान आहे आणि रस्त्यावर थोडीशी चढण आहे, त्यामुळे तिला खूप मेहनत करून हातगाडी ओढावा लागत आहे. ती जीव तोडून हातगाडी पुढे न्यायचा प्रयत्न करत असते, तेवढ्यात तिचा पाळीव कुत्रा तिला दुरून पाहतो. तो लगेच ओळखतो की त्याची मालकीण अडचणीत आहे आणि लगेच तो तिच्या मदतीला धावतो.
पाहा व्हिडिओ
यानंतर जे घडतं ते खरंच मनाला स्पर्श करणारं आहे. हातगाडीवर ठेवलेली पोती तो कुत्रा दातांनी धरतो आणि ती स्वतः ओढू लागतो. त्या क्षणी, जणू तो त्याच्या मालकिणीचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतो. हा क्षण पाहून कोणालाही जाणवतं की नातं फक्त शब्दांवर नाही तर भावना आणि ममतेवर टिकलेलं असतं. या व्हिडीओमध्ये अशाच काही इतर छोट्या क्लिप्सदेखील आहेत, ज्यात वेगवेगळे कुत्रे आपल्या मालकांना मदत करताना दिसतात.
या भावनिक व्हिडीओवर लोकांनी सोशल मीडियावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तीन मिलियनहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून, अनेकांनी “खरंच प्राणी माणसांपेक्षा जास्त संवेदनशील असतात”, “डोळ्यात पाणी आलं”, “ही खरी ममता आहे”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर या कुत्र्याला ‘रिअल हीरो’ म्हटलं आहे.
हा व्हिडीओ पुन्हा एकदा दाखवतो की नाती केवळ शब्दांनी नव्हे तर कृतींनी जपली जातात आणि प्राणी हे निःस्वार्थ प्रेमाचं सर्वात सुंदर उदाहरण आहेत. या एका छोट्या कृतीतून कुत्र्याने दाखवून दिलं की ‘मदत’ ही भावना प्राण्यांच्या मनातही तितकीच जिवंत असते, जितकी माणसांच्या.
