Premium

५२ वर्ष सुखी संसाराची! शिमलामधील ‘हे’ वृद्ध जोडपं जिंकतंय नेटकऱ्यांचं मन; Video व्हायरल

सोशल मीडियावर एका वृद्ध जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे…

Viral Video of Elderly couple Married for 52 years from Shimla is winning the hearts of netizens
(सौजन्य:इन्स्टाग्राम/ @clickeranshu) ५२ वर्ष सुखी संसाराची! शिमलामधील 'हे' वृद्ध जोडपं जिंकतंय नेटकऱ्यांचं मन; Video व्हायरल

हिवाळा ऋतू सुरू झाला की, अनेक जण कुटुंबाबरोबर किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. यातच प्रत्येकाचे शिमला हे ठिकाण ठरलेले असते. शिमला हे ठिकाण प्रत्येक वयोगटातील लोकांना आकर्षित करते. तर सोशल मीडियावर शिमलाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तरुण मंडळी किंवा कोणते कुटुंब नसून एक खास जोडपं आहे आणि त्यांचा हा खास व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ शिमलाचा आहे. एक आजी-आजोबांचं जोडपं रस्त्याकडेने जात असते. तितक्यात मागून एक फोटोग्राफर येतो आणि या वृद्ध जोडप्याला आवाज देतो आणि तुम्ही दोघं एकत्र खूप छान दिसताय, मी तुमचा फोटो काढू शकतो का? असे विचारतो. त्यावर आजी कुठे टाकणार फोटो, असे फोटोग्राफरला विचारतात. तेव्हा फोटोग्राफर त्यांचे इन्स्टाग्राम अकाउंट दाखवतो आणि वृद्ध जोडपं फोटो काढण्यासाठी तयार होतात. फोटोग्राफरने या खास जोडप्याचा काढलेला फोटो एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा.

हेही वाचा…Video : “पडद्यामागे शांतपणे काम….” कर्तव्यदक्ष पोलिसाचा ‘तो’ व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल सलाम!

व्हिडीओ नक्की बघा :

लग्नाची ५२ वर्ष :

फोटो काढताना फोटोग्राफर आजी-आजोबांना त्यांच्या खासगी जीवनाबद्दल अनेक प्रश्न विचारतो. तेव्हा वृद्ध जोडपं सांगतात की, आमच्या लग्नाला ५२ वर्ष पूर्ण झाली आहेत. तसेच आजी पूर्वी दिल्लीमध्ये रहायच्या, तर अरेंज मॅरेज झाल्यानंतर त्या शिमलामध्ये राहण्यास आल्या, असे त्यांनी व्हिडीओत सांगितले आहे. फोटो काढून झाल्यावर फोटोग्राफर त्यांना फोटो दाखवतो, तेव्हा आजोबा त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला धन्यवाद म्हणतात आणि मग पुढे निघून जातात.

तर, या खास क्षणाचा फोटोग्राफरने एक व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर @clickeranshu या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. तसेच फोटोग्राफरने वृद्ध जोडप्याचा काढलेला सुंदर फोटो पाहून एका युजरने ‘भारतीय संस्कृतीचे खरे सौंदर्य’ अशी कमेंट केली आहे. तर अनेक नेटकरी विविध शब्दांत त्यांच्या भावना कमेंटमध्ये मांडताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video of elderly couple married for 52 years from shimla is winning the hearts of netizens asp

First published on: 04-12-2023 at 19:00 IST
Next Story
VIDEO : प्रियकराने धोका दिला म्हणून संतापली प्रेयसी, थेट सहाव्या मजल्यावरून रस्त्यावर कपडे फेकले अन्…