रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढताना ट्रेनमधून पडणाऱ्या प्रवाशांचा व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतो. मात्र, प्रवाशांना वाचवण्यासाठी रेल्वे सुरक्षा कर्मचारी प्लॅटफॉर्मवर तैनात असतात. भारतीय रेल्वे नेहमी सर्व प्रवाशांना सल्ला देते की कधीही चालत्या ट्रेनमध्ये चढू नये, अन्यथा ते अपघाताला बळी पडू शकतात. मात्र तरीही प्रवाशी या नियमांकडे दुर्लक्ष करून चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. वारंवार आवाहन केलं जात असलं तरी काही महानग असे असतात जे यातून कोणताही धडा घेत नाहीत आणि आपला जीव धोक्यात घालतात.कधी कधी ते मोठ्या अपघाताला बळी पडतात आणि मृत्यूही पत्करतात. सध्या अशीच एक रेल्वे स्थानकावरील घटना समोर आलीय. ज्यामध्ये एका वृद्धाचा जीव महिला जवानाने वाचवला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक वृद्ध व्यक्ती ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र वृद्धाला ट्रेन पकडता येत नाही आणि तो खाली कोसळतो. तो ट्रेनखाली जाणार तेवढ्यात एक महिला आरपीएफ कॉन्स्टेबल धावत येते आणि त्याला ओढते. ट्रेनखाली जाणार तेवढ्यात देवदूतासारखा ती महिला कॉन्स्टेबल येते. या महिला कॉन्स्टेबलच्या सतर्कतेमुळेच त्या वृद्धाचा जीव वाचला. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – जग भ्रमंतीसाठी बूक केले १७ लाखांचे ड्रीम क्रूझ; जहाज व्यक्तीला न घेताच रवाना

RPF_INDIA नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर भरपूर लाईक्स आणि कमेंट येत आहेत. त्या आरपीएफ महिलेचं नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जातंय. यापूर्वीही स्टेशवर अशा अनेक घटना घडल्या आहेत, तरीही लोक यातून धडा न घेता अशीच स्टंटबाजी करत जीव धोक्यात घालतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video old man who fell down while catching a train srk