सध्या भारत आणि आजूबाजूच्या देशांना प्रचंड उष्णतेला सामोरे जावे लागत आहे. या देशांतील लोकांना गरमीमुळे अनेक समस्या येत आहेत. याच दरम्यान जर कोणी जंगलात आग लावली तर काय होईल? पाकिस्तानी सोशल मीडिया सेन्सेशन हुमैरा असगर हिने चांगले व्हिडीओ शूट करण्यासाठी आग लागलेल्या जंगलाची निवड केली आहे. आता मात्र या व्हिडीओचे कौतुक होण्याऐवजी नेटकऱ्यांच्या टीकेला तिला सामोरे जावे लागत आहे.
टिकटॉकवर ११ मिलियन फॉलोअर्स असणाऱ्या हुमैरा असगरचा देश, जग, हवामान बदल, ग्लोबल वार्मिंग यांसारख्या समस्यांशी काहीही संबंध नाही. तिचा हा फायर व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र व्हिडीओमधील तिच्या सौंदर्याकडे कोणाचंच लक्ष नसून, प्रत्येकजण जंगलाला लागलेल्या आगीबद्दल बोलत आहे. या व्हिडीओवरून हुमैरावर जोरदार टीका केली जात आहे.
टिकटॉकवर हुमैराचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती आगीच्या बाजूने येताना दिसत आहे. यात तिने सिल्व्हर कलरचा गाऊन घातला आहे आणि व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला पसुरी गाण्याचे बोल वाजत आहेत. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने म्हटलंय, ‘मी जिथे जाते, तिथे आग लागते.’ या व्हिडीओने टिकटॉकवरच नव्हे तर पर्यावरणप्रेमींच्या मनात आग पेटवली आहे.
अवघ्या पाच वर्षांच्या मुलीनं बाळाला दिला होता जन्म; घटना वाचून थक्क व्हाल
हा व्हिडीओ आता ट्विटरवरही व्हायरल होत आहे. @PakistanNature ने शेअर केला आहे आणि सरकारला आवाहन केले आहे की या व्हिडीओमधील पाकिस्तानी टिकटॉकवर बंदी घालण्यात यावी. या ट्विटमध्ये मागणी करण्यात आली आहे की, ब्रँडसोबत हुमायरालाही शिक्षा व्हायला हवी जेणेकरून ते अशा लहान लहान व्हिडीओसाठी निसर्गाशी खेळणे थांबेल.
“कॅमेरामध्येच घुसून राहू का?” सततच्या व्हिडीओ शूटिंगला कंटाळलेल्या मुलाने वडिलांनाच धरलं धारेवर
हा व्हिडीओ पोस्ट करण्याच्या काही दिवसांपूर्वी, जमीन वापरण्यासाठी जंगलाला आग लावल्याप्रकरणी आणखी एका पाकिस्तानी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही गोष्ट ग्लॅमराइज करण्यासारखी नाही, असे युजर्सचे म्हणणे आहे.