Pune Police Viral Video: काही लोकांचा आवाज इतका भावपूर्ण आणि मंत्रमुग्ध करणारा असतो की ते प्रोफेशनल गायक नसले तरीही त्यांना ऐकतच रहावेसे वाटते. अनेकदा अशा टॅलेंटेड मंडळींचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होत असतात. पुणे पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून कॉन्स्टेबल सागर घोरपडे यांचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. अरिजित सिंगच्या आवाजातील देश मेरे गाणे मुळातच अत्यंत भावनिक आहे आणि त्यात जेव्हा खाकी वर्दी घालून सागर हे गाणे गातात तेव्हा त्या गाण्याची तळमळ आपल्यापर्यंत पोहोचतेच. देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सैन्याला समर्पीत असे हे गाणे आज वर्षभरानंतरही तितकेच हिट आहे.
या व्हिडिओला ७,६०० पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. “एखादे गाणे देशाला समर्पित करण्यासाठी विशेष दिवसाची गरज नाही,” असे कॅप्शन देऊन पुणे पोलिसांनी हा व्हिडीओ शेअर केला होता. आमचे #PunePolice Constable सागर घोरपडे यांनी ‘देश मेरे..’ सुंदर गायले आहे,” असेही या ट्वीटमध्ये पुढे लिहिले आहे. या व्हिडिओला अत्यंत सुंदर प्रतिसाद दिसत आहे. खास म्हणजे या व्हिडिओवर एकही ट्रोलिंग कमेंट नाही. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या च्या भुज: द प्राईड ऑफ इंडिया या चित्रपटातील ‘देश मेरे’ गाणे गाऊन या पोलीस अधिकाऱ्याने नेटकऱ्यांना भावुक केले आहे.
अंगावर शहारा आणेल हा व्हिडीओ
पोलीस हवालदार सागर घोरपडे यांच्या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करून त्यांच्या आवाजाचे कौतुक केले आहे. आश्चर्य म्हणजे यापूर्वी गणेशोत्सवाच्या वेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी ड्युटीवर असताना नाच केल्यावरून वाद झाला होता, तुम्ही पोलिसांच्या गणवेशाचा मान ठेवत नाही असेही अनेकांनी म्हंटले होते मात्र सागर घोरपडे यांनी खाकी घालून शूट केलेल्या या व्हिडिओला मात्र अगदीच सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरु नका.