Viral Video: या जगात जगण्यासाठी प्रत्येक व्यक्ती संघर्ष करत असतो. मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांच्या अनेक अपेक्षा असतात, ज्या पूर्ण करण्यासाठी ते दिवस-रात्र कष्ट घेतात. गरीब व्यक्ती फक्त दोन वेळचे पोटभर जेवायला मिळावे, हीच त्याची सर्वात मोठी अपेक्षा असते. मनुष्यांप्रमाणे प्राणीदेखील आपली भूक मिटवण्यासाठीच जगतात. आपली भूक मिटवणं हेच त्यांच्या जगण्याचे एकमेव साधन आहे. यासाठी ते जंगलातील इतर प्राण्यांची शिकार करतात. प्राण्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

सोशल मीडियावर प्राण्यांचे नवनवीन व्हिडीओ सतत समोर येत असतात, ज्यात कधी एखादा वाघ, सिंह, बिबट्या इतर प्राण्यांची शिकार करताना आपण पाहतो तर कधी इतर प्राणी या हिंस्र प्राण्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करताना दिसतात; असे थरारक व्हिडीओ खूप चर्चेत येतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक चित्ता सशांची शिकार करताना दिसत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलातील असून यामध्ये तुम्ही पाहू शकता, काही चित्ते गवताळ प्रदेशात फिरत आहेत. त्यावेळी अचानक त्यांच्यातील एक चित्ता धावत येतो आणि कोणाचातरी पाठलाग करतो. सुरुवातीला तो नक्की कोणाचा पाठलाग करतोय हे दिसले नाही. मात्र, पुढे चित्ता आणखी जोरात धावतो आणि सशावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी ससादेखील स्वतःचा जीव मुठीत घेऊन धावतो, पण शेवटी तो जोरात पडतो आणि चित्त्याच्या तावडीत सापडतो. हा थरारक व्हिडीओ पाहून काही क्षण तुम्हालाही भीती वाटेल.

हेही वाचा: हद्दच झाली राव! क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीचा घराबाहेर राडा, एकमेकांना बेदम चोपलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांना आलं हसू

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ यूट्यूबरील @WildInformat या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “सशाच्या पळण्याच्या स्पीडचेपण कौतुक करा.” तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “निसर्गाचा नियम”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “हे आम्हाला बघवत नाही.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “चित्त्याचा वेग म्हणजे, अतिशय भयानक.”