Viral Video Shows Cutest Elephant Proposal : आजकाल अनेक मंडळी एखादे खास सरप्राईज देऊन, अंगठी किंवा पुष्पगुच्छ देऊन आपल्या आवडत्या व्यक्तीला किंवा प्रेयसीला प्रपोज करतात. आपल्या आवडत्या व्यक्तीला किंवा प्रेयसीला प्रपोज करणे वाटते तितके सोपे नसते. कारण- काही जण हे प्रेम आनंदाने स्वीकारतात; तर अनेक जण प्रेम नाकारतात. पण, तुम्ही कधी प्राण्यांना एकमेकांना प्रपोज करताना पाहिले आहे का? नाही तर मग आज सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला असाच एक व्हिडीओ (Video) जरूर पाहा, जो तुमचेही मन जिंकू शकेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओनुसार (Video) हत्ती प्रेयसीला प्रपोज करायला जात आहे आणि त्यासाठी त्याने खास तयारीसुद्धा केल्याचे दिसत आहे. हत्तीने आपल्या सोंडेत जांभळ्या रंगाची फुले धरली आहेत. दबक्या पावलांनी चालत तो आपल्या प्रेयसीकडे येतो आणि तिला फुले देतो. जोडीदार हत्तीणसुद्धा आपल्या सोंडेने ती फुले स्वीकारते आणि मग दोघेही एकमेकांना त्यांच्या स्टाईलमध्ये धन्यवाद म्हणताना दिसतात. हत्तीने आपल्या जोडीदाराला केलेले प्रपोज व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

जंगलातील प्राणी कसे राहतात, ते काय खातात, ते शिकार कसे करतात आदी अनेक गोष्टींबद्दलची माहिती जाणून घेण्याची आपल्या सगळ्यांना खूप उत्सुकता असते. तर आज या व्हायरल व्हिडीओत (Video) प्राण्यांमधील प्रेम पाहायला मिळाले आहे. तुम्ही पाहिले असेल की, हत्ती सोंडेतून फुले घेऊन येतो आणि ती आपल्या प्रेयसीला देतो. त्यानंतर प्रेयसी सोंडेने ती फुले आपल्याजवळ घेते. थोडेसे पायावर बसून धन्यवाद म्हणते आणि पुन्हा तीच फुले सोंडेने त्या हत्तीला परत देते. तुम्ही आतापर्यंत अनेक महागडी गिफ्ट देऊन जोडीदाराला प्रपोज केल्याचे पाहिले असेल. पण, हा प्रपोज अगदी जगावेगळा आहे.

हत्तीला त्याचा साथी भेटला

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @spwrites20 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून कमेंट्समध्ये प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. ‘आता आम्हाला या दोघांचे लग्नसुद्धा बघायचे आहे’, असे एक जण म्हणताना दिसत आहेत. आपल्यापेक्षा प्रेमळ लव्ह लाईफ त्यांची आहे. हत्तीला त्याचा साथी भेटला, दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा आहे आदी अनेक कमेंट्स व्हिडीओखाली नेटकरी करताना दिसून आले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows elephants proposed to their partner with flowers must watch cutest proposal asp