Video Shows Cat Brings Teddy Bear For Their Kittens : आईचे प्रेम खरे म्हणायला गेले तर शब्दात मांडणे कठीण असते. पण, तिचे प्रेम, माया, कष्ट, त्याग आपण दररोज पाहत असतो. प्रत्येकाच्या ऑफिस, शाळेच्या वेळेत उठून त्याला बाहेर पडेपर्यंत धडपडणे, जेवण कमी पडत असेल तर आपल्या ताटातील अर्धी भाकर समोरच्याला देणे, नातू पडला तरीही त्याच्या दोष आपल्यावर घेणे अशा उपकारांची परतफेड कुणीच करू शकत नाही. आई ही आई असते, मग ती माणसाची किंवा प्राण्याची असो. तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल होतो आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आई कोणाकडे गेली आणि त्यांनी तिच्या हातावर खाऊ टेकवला की, थोडा खाऊ डब्यात भरून ती आपल्या बाळासाठी सुद्धा घरी घेऊन जाते. तर आज असेच काहीसे दृश्य व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळाले आहे. एक छोटासा टेडी बिअर ती तोंडात पकडून आपल्या पिल्लांना शोधत चालली आहे. रस्त्यामध्ये सांडपाण्याने गटार तुडुंब भरलेले असते तरीही मांजर आपल्या तोंडात टेडी बिअर पकडून, एकदा उडी मारून उजवीकडे तर एकदा उडी मारून डावीकडे जाताना दिसते आहे. आईची माया व्हायरल व्हिडीओतून (Video) एकदा बघाच…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पहिले असेल की, मांजरीला रस्त्याकडेला एक टेडी बिअर पडलेला दिसतो आहे. तो टेडी बिअर आपल्या लहान पिल्लांसाठी घेऊन जाण्याचे ती ठरवते. त्यामुळे तोंडात टेडी बिअर पकडून, वाट काढून तिच्या पिल्लांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर अखेर ती तिच्या पिल्लांकडे पोहचते आणि त्यांच्या जवळ टेडी बिअर ठेवते. पण, यादरम्यान पिल्लांपर्यंत पोहचण्याची कसरत पाहून तुम्हीही थक्क व्हाल आणि आई ही आई असते, मग ती माणसाची किंवा प्राण्याची असो असे तर नक्कीच म्हणाल.

देव या कुटुंबाला आशीर्वाद देवो

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @pets_screen या इस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘कितीही कठीण असले तरीही प्रत्येक आईला त्यांच्या मुलाचे जग थोडे आणखीन खास करण्याचा एक मार्ग तर सापडतोच’ ; अशी कॅप्शन देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून ‘देव या कुटुंबाला आशीर्वाद देवो आणि त्यांना सुरक्षित, आनंदी आणि निरोगी ठेवो, हा टेडी बिअर पाहून तिच्या मनात आले असेल की , माझी पिल्लं पण खेळतील, तर अनेक जण व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows every mom finds a way to make their child world a little brighter asp