Viral Video Of Pet Dog : आजच्या काळात लोक आपापल्या घरी विविध प्रकारचे प्राणी पाळणे पसंत करतात. कोणी मांजर, कोणी पोपट, तर कोणी श्वान पाळते. घरात प्राणी पाळल्याने घरात आनंदी आणि उत्साही वातावरण असते. अगदी एखाद्या लहान बाळाप्रमाणे हे पाळीव श्वानसुद्धा काही ना काही खोड्या करीत असतात. घरातील वस्तू नकळत किंवा मुद्दामहून तोडणे, घरात पसारा करणे किंवा टेबल, खुर्च्या दातांनी कुरतडत बसतात. यावर उपाय म्हणून पाळीव मालकाच्या श्वानाने जबरदस्त उपाय शोधून काढला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओच्या (Video) सुरुवातीला पाळीव श्वान टेबलाचे टोक दातांनी कुरतडताना दिसतो आहे. टेबल कुरतडणे हे श्वानाच्या आरोग्यासाठीसुद्धा हानीकारक ठरू शकते आणि त्याचबरोबर टेबलाचेही नुकसान होऊ शकते. त्यामुळे या दोन्ही गोष्टी टाळण्यासाठी श्वानमालकाला एक युक्ती सुचली. त्याने टेबलाच्या कडेला थोडा तिखट मसाला टाकून ठेवला. हे पाहून श्वानाने नेमके काय केले ते व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

अनेकदा लहान मुलांना नखे खाण्याची किंवा अंगठा चोखण्याची सवय असते. तेव्हा त्यांची सवय सोडवण्यासाठी आपण त्यांच्या नखांना मसाला किंवा कडू पदार्थाचा रस लावून ठेवतो. तसेच काहीसे व्हायरल व्हिडीओतसुद्धा (Video) पाहायला मिळाले आहे. श्वान टेबल कुरतडत असतो. हे पाहून श्वानाचा मालक दुसऱ्या दिवशी टेबलावर तिखट मसाला ठेवतो. मग श्वान टेबलाकडे ढुंकूनसुद्धा बघत नाही. श्वानाचे हावभाव पाहून तुम्हालाही प्रचंड हसू येईल. मालक दररोज मसाला टेबलावर ठेवतो हे पाहून श्वानाची टेबल कुरतडण्याची सवय हळूहळू सुटते.

तोंडाला खाज येत असेल बहुतेक

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @jojopawsome या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेक जण हा व्हिडीओ पाहून, “हा तर देशी जुगाड आहे”, असे म्हणत आहेत. तर काही जण श्वानमालकाला, “त्याच्यासाठी चघळण्याची खेळणी विकत घे म्हणजे तो फर्निचर चावणार नाही. त्याला दात येत आहेत, तोंडाला खाज येत असेल बहुतेक”, “मिरची पावडरऐवजी लिंबाचा रस वापरा. ​​लिंबाचा रस १००% काम करेल”, असे उपाय सुचविताना दिसले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows how owner stop him stop biting furniture watch desi jugaad asp