Children’s Made Teddy Bear Ganpati Bappa Viral Video : लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आता फक्त ३२ दिवस राहिले आहेत. गणरायाच्या स्वागतासाठी गणेशभक्त सज्ज आहेत. कोण सजावट काय करायची या विचारात, तर कोण गणपतीची मूर्ती बुक करतो आहे. यादरम्यान मुंबईचा राजाचे डेकोरेशन, तर चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनाची तारीखदेखील समोर आली आहे. त्यामुळे गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसतो आहे. आता सोशल मीडियावर काही चिमुकल्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांनी छोटासा गणपती बसवल्याचे दिसते आहे.

लहान मुले प्रत्येक कार्यक्रमाचे निरीक्षण करून, अगदी हुबेहूब त्यांच्या मित्र-मैत्रिणींबरोबर खेळताना दिसतात. तर आज या चिमुकल्यांनी गणेशोत्सव साजरा करायचे ठरवले आहे. गणपती समजून या चिमुकल्यांनी छोटासा टेडी बीयर बसवला आहे. तीन चिमुकल्या ‘बाप्पा मोरया रे’ हे गाणे म्हणत तिघीही गणपती बाप्पासाठी (टेडी बीयर) आरती म्हणताना दिसत आहेत. एक जण आरतीचे ताट म्हणून थर्माकोलचे बाऊल पकडून उभी आहे. तर दुसरी चिमुकली का माहीत नाही; पण हातात स्कार्फ घेऊन, तो बाप्पासमोर फिरविताना दिसते आहे. तिसरी मुलगी आरतीला ताल देण्यासाठी टिफीन वाजवताना दिसते आहे…

यालाच म्हणतात निःस्वार्थ भक्ती! (Viral Video)

निःस्वार्थी भक्ती आणि प्रेमाने देवालाही जिंकता येते, असे म्हणतात. आज या चिमुकलींनी त्याचे प्रात्यक्षिक दाखवले आहे. गणपती बाप्पाची मूर्ती नाही, खरे आरतीचे ताट नाही, आरती म्हणण्यासाठी ढोल वा टाळ नाही. पण, चिमुकलींचे बाप्पावरील प्रेम त्यांच्या गोड आवाजातील आरतीद्वारे दिसते आहे. त्यांच्यातील निरागसता, बाप्पाची सेवा करण्याची इच्छा एवढेच फक्त या व्हिडीओतून दिसते आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या चिमुकल्या भक्तांचा व्हिडीओ बघाच…

व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

https://www.instagram.com/reel/DMPalrzyCVX/?igsh=MWEwdnl5eXE2ZGVjeQ%3D%3D

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @gavthi_meme_waala या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओला ‘आरती घ्या सगळ्यांनी… प्रसाद सगळ्यांना मिळेल कोणीही धक्काबुक्की करू नका’, अशी मजेशीर कॅप्शन देण्यात आली आहे. तसेच नेटकरी व्हिडीओ पाहून “टिफीनचा ढोल. सो क्युट. पण, ती स्कार्फ गोल का फिरवत आहे., कोण सांगेल का मला”, “ह्यांची पूजा सगळ्यात आधी बाप्पाला पोहोचणार. कारण- त्यांच्या भक्तीत स्वार्थ नाही, तर निःस्वार्थ भाव आहे, निरागसता आहे आणि देव भावाचा भुकेला, भाव देखोनी भुलला” , “संस्कार, संस्कृती” आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.