Viral Video Shows Man Ask Auto Riksha Driver To Drop Him To Panvel : भटक्या श्वानांची भीती माणसांच्या मनात खोलवर रुजली असली तरीही त्याच्या प्रामाणिकपणाचेही वारंवार आवर्जून कौतुक केले जाते. एवढेच नाही, तर काही जण केवळ या श्वानांशी मस्ती करीत आपला संपूर्ण दिवस घालवतात. अशाच काही श्वानप्रेमींनी आपल्या कॅमेर्‍यामध्ये त्यांच्या परिसरातील भटक्या श्वानाबरोबरची मस्ती कॅमेर्‍यात टिपून सोशल मीडियावर शेअर केली आहे. नक्की श्वानाबरोबर काय मस्ती सुरू आहे बातमीतून सविस्तर जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) आहे याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पण, एक भटका श्वान रिक्षात ऐटीत बसला आहे आणि त्याला पाहून एक अज्ञात व्यक्ती त्याच्याजवळ जाते. हा श्वान रिक्षाचालकाच्या जागेवर अगदी शांतपणे बसलेला असतो. हे पाहून अज्ञात व्यक्ती त्याची खोड काढण्यास सुरुवात करते. आपण रिक्षाचालकांना बहुधा दादा म्हणून हाक मारतो आणि अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी सोडाल का, असं विचारतो. तर, रिक्षाचालकाच्या जागेवर बसलेल्या श्वानाला अज्ञात व्यक्ती नेमकं काय म्हणाली, ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…Viral Video: ‘जिलेबी देणाऱ्या आईला भेटायचंय…’ चिमुकल्यांच्या डब्यातील पदार्थ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; म्हणाल, ‘आमच्या वेळी…

व्हिडीओ नक्की बघा…

एक्स्क्यूज मी दादा…

व्हायरल व्हिडीओत ( Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, अज्ञात व्यक्ती रिक्षाजवळ जाते. रिक्षाचालकाच्या सीटवर ऐटीत बसलेल्या श्वानाला ‘एक्स्क्यूज मी दादा, पनवेलला सोडाल का?’ असं विचारते. पण, श्वान ‘ॲटिट्यूड’ दाखवीत अज्ञात व्यक्तीकडे बघतो आणि काहीच उत्तर न देणं पसंत करतो. यादरम्यान श्वानानं रिक्षात बसून रिक्षाचालकाची सीटसुद्धा नखांनी खराब केल्याचे दिसते, हे व्हिडीओत दाखवायला अज्ञात व्यक्ती जेव्हा फोन घेऊन पुढे जाते तेव्हा श्वान थोडा घाबरतो. पण ती अनोळखी व्यक्ती, “तू घाबरू नकोस. मी जातो, तू ऐटीत बस”, असं सांगून निघून जाते.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @akiiiiii_0670 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘एक्स्क्यूज मी दादा’, अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिली आहे. नेटकरी व्हायरल व्हिडीओतील श्वानाचा ‘ॲटिट्यूड लूक’ पाहून पोट धरून हसत आहेत. एका युजरने , “काय ॲटिट्यूड असतो या अशा रिक्षाचालकांचा काय माहीत.” तर दुसरा म्हणतोय, “दादा मागे लागले, तर सुसाट फुकटमध्ये पनवेल पोहोचाल” आदी अनेक मजेशीर कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows man ask auto riksha driver dog drop him to panvel watch funny scene asp