Viral video Of Bride And Groom : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास दिवस असतो. भारतात लग्न म्हणजे काही ना काही नवीन गोष्ट घडतेच. कधी काय होईल याचा अंदाज लावणे कठीणच असते. लग्नापूर्वी खरेदी करण्यापासून ते अगदी नोकरीवर सुट्टी टाकण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचे नियोजन करावे लागते. नोकरी करणारे, तर कामावर सुट्टी घेऊ शकतात. पण, व्यवसाय करणाऱ्यांना मात्र अगदी लग्नाच्या दिवशीसुद्धा काम करावे लागते. तर आज असेच काहीसे दृश्य दाखविणारा आजचा व्हायरल व्हिडीओ आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओत आश्रय आणि खुशबू या जोडप्याचे नुकतेच लग्न झालेले असते. लग्न झाल्यानंतर त्यांचा गृहप्रवेश होत असतो. पण, नवरा दुकानमालक असल्यामुळे एका ग्राहकाचा त्याला फोन येतो. एका दुकानमालकासाठी ग्राहक अगदी देवासमान असतो. त्यामुळे तो फोन लगेच उचलतो. त्यानंतर आज दुकान बंद आहे; उद्या चालू होईल, असे आवर्जून सांगतो. पण, ग्राहक कदाचित त्याला एखाद्या वस्तूची किंमत विचारतो. ग्राहकाने विचारल्यावर नवरा, पिवळी २२० आणि काळी १८० रुपये आहे, असे उत्तर देतो.

गृहप्रवेश तर होत राहील, ग्राहक नाही गेला पाहिजे (Viral Video) :

अधिकाधिक ग्राहक आपल्या दुकानात यावेत, दुकानातील वस्तू विकल्या जाव्यात यासाठी दुकानमालक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. पण, आज व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, ग्राहक नाराज होऊ नये यासाठी नवऱ्याने गृहप्रवेश करतानाच फोन उचलला आणि त्याला हवी ती माहिती दिली. तसेच खासकरून वस्तूची किंमत सांगितल्यानंतर तर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला आणि त्याने त्यानंतर फोन ठेवून दिला. हे पाहून नवरीने हा व्हिडीओ ‘गृहप्रवेश तर होत राहील, ग्राहक नाही गेला पाहिजे’ अशा कॅप्शनसह शेअर केला आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @imkhushboo_2.o आणि @aashray_aroraया इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘जेव्हा तुम्ही दुकानमालकाशी लग्न करता’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नवऱ्याच्या अशा वागण्यावर नवरीचे हावभाव पाहून अनेक नेटकरी मजेशीर कमेंट्स करताना दिसत आहेत. नशीब दुकानात नाही गेला, लग्न होत राहील; पण व्यवसाय पहिला झाला पाहिजे, रिअल लाइफ जेठालाल, पक्का व्यापारी आहेस आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows man attend customer call while entering the house with wife asp