Video Shows Groom broke traditions and Dance For Her Future Wife : लग्न हा मुलीच्या आयुष्यातील सगळ्यात खास दिवस असतो. त्यामुळे आपल्या लग्नाच्या दिवशी आपण किंवा आपल्या जोडीदाराने नकळतपणे लक्षात राहील असे काहीतरी करावे, अशी तिची इच्छा असते. तसेच सध्या मंडपात येण्यापूर्वी डान्स करणे हा जणू काही एक ट्रेंडच झाला आहे. प्रत्येक नवरी आपल्या नवऱ्याची प्रशंसा करीत डान्स करते. पण, आज सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका नवऱ्या मुलाने परंपरा मोडून काढत आपल्या होणाऱ्या बायकोसाठी खास डान्स केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडीओच्या सुरुवातीला लाल लेहेंगा परिधान करून नवरी उभी असते. नवरीची मंडपात एंट्री होण्यापूर्वी तिचा होणारा नवरा तिला खास सरप्राईज देतो. नवरा मुलगा मंडपातून खाली येतो आणि ‘कुछ ना कहो’ अल्बममधील ‘तुम्हे आज मैने जो देखा’ हे गाणे वाजण्यास सुरुवात होते आणि या गाण्याच्या बोलावर आधारित तो डान्स करण्यास सुरुवात करतो, जे पाहून सगळेच थक्क होऊन जातात. नवऱ्याने बायकोसाठी केलेला डान्स व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

परंपरा मोडून सगळ्यांचे मन जिंकले

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, नवरीची मंडपात एंट्री होताना नवरा जबरदस्त डान्स करतो. ते पाहून नवरीसह हॉलमध्ये उपस्थित असलेले सगळेच थक्क होऊन जातात. ‘तुम्हे आज मैने जो देखा’ या गाण्यावर त्यांचे हावभाव, त्याच्या स्टेप्स आणि त्यांची प्रेम व्यक्त करण्याची स्टाईल तर अगदी बघण्यासारखी आहे. तसेच डान्स करताना नवरीला खास वाटावे म्हणून तो इतरांना टाळ्या वाजवण्याचे इशारेसुद्धा देतो आहे, जे पाहून तुम्हीही त्याचे कौतुक कराल एवढे नक्की.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @himani2603 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘नेहमीच नवरी डान्स करते; पण यावेळी नवऱ्याने प्रत्येक पावलावर आपले प्रेम व्यक्त करीत डान्स केला. परंपरा मोडून सगळ्यांचे मन जिंकले’, अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून ‘असा नवरा मिळवण्यासाठी तू कोणता उपवास केलास, परफेक्ट, तर अनेक जण- नवऱ्याच्या डान्सचे कौतुक करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows not bride but this time groom broke traditions and dance for her future wife on tumhe aaj maine jo dekha song asp