Funny Viral Video Of Bride And Groom : नवरा-नवरीसाठी लग्न हा खास क्षण असतो. पण, या लग्नात अनेक जण वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतात. मामा नवरीला लग्नमंडपात घेऊन येतो, आई-बाबा मुलीचे कन्यादान करतात, देढा व करवली छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये जोडप्याला मदत करत असतात. तसेच हे लग्न विधिवत पार पडावे म्हणून त्यात भटजीसुद्धा महत्त्वाची भूमिका पार पाडतात. नवरा-नवरीचे सात जन्माचे सात फेरे घेईपर्यंत भटजी वैदिक मंत्रांचे पठण करत असतात. नवरा-नवरीच्या मध्ये अंतरपाट असताना भटजी पहिल्यांदा मंगलाष्टक म्हणतात. त्यानंतर इतरही अनेक जण मंगलाष्टक म्हणण्याची हौस भागवून घेत, त्यातून आपले कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न करतात. तर या पार्श्वभूमीवर आज अशाच एका भटजीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडीओनुसार वधू-वर आणि भटजी यांच्यातील एक छोटा; पण मजेदार संवाद व्हायरल होत आहे. नवरा नवरीच्या बोटात अंगठी घालण्यादरम्यान भटजी वैदिक मंत्रांचे पठण करीत असतात. या प्रसंगात ती अंगठी काही केल्या नवरीच्या बोटात जात नव्हती. हा सगळा प्रसंग भटजी पाहत असतात. मग ते वातावरण थोडे हलके अन् मजेशीर व्हावे म्हणून भटजींनी मंत्रांचे पठण करण्याच्या सूरातच अगदीच मजेशीर विनोद केला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. नक्की काय घडले ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, आशना (Aashna) आणि शिवा (Shiva) या जोडप्याचे लग्न असते. यादरम्यान अंगठी नवरीच्या बोटात अगदी जात नसते म्हणून भटजी ‘तिला जिममध्ये जाण्याची गरज आहे’ (she needs to go to gym), असे मंत्र म्हणण्याच्या सूरात इंग्रजीमध्ये म्हणतात आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो, जे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. अनेकदा वजनावरून बोलल्यावर अनेकांना राग येतो. पण, या जोडप्याने भटजींचा हा विनोद अगदीच हसण्यावारी नेला, जे पाहून तुम्ही त्यांचेही कौतुक कराल एवढे नक्की.

लग्न समारंभाचा सर्वात अविस्मरणीय क्षण

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @aashhoudit आणि @mrshivaoudit या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘जेव्हा तुमच्या भटजींकडे सर्व जोक्स असतात. माझ्या लग्न समारंभाचा सर्वांत अविस्मरणीय भाग,’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा मजेशीर कमेंट्स करताना दिसत आहेत. ‘नक्की कोणाला जिमला जाण्याची गरज आहे. हसणारे जोडपे आणि ते विनोद करू शकणारे भटजी खूप छान वाटले व्हिडीओ पाहून आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows pandit ji making bride groom wedding ceremony memorable must listen his funny joke asp