Viral Video Shows Techer Make Student Cutout : शाळा, कॉलेजची आठवण आली की, विद्यार्थ्यांना सगळ्यात पहिल्यांदा आठवतात ते शिकवणारे शिक्षक. शिक्षक व विद्यार्थ्याचे नाते कसे असावे यावर अनेकदा बोलले जाते. जुन्या पिढीचे लोक शिक्षकांना खूप घाबरायचे. पण, आता तुम्ही सोशल मीडियावर पाहिलेत, तर विद्यार्थ्यांना निरनिराळे खेळ दाखवत त्यांचा अभ्यास घेतला जातो. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांचे नाते एका बाजूला भीती, तर दुसरीकडे ते नाते आदरावर आधारित असते. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ परदेशातील आहे. व्हिडीओत पदवी प्रदान करण्याचा समारंभ सुरू असतो. यादरम्यान पदवीचे शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पदक दिले जात आहे. पण, पदवीधर होण्यापूर्वीच एक विद्यार्थिनी देवाघरी गेलेली असते. म्हणजेच तिचे निधन झालेले असते. त्या विद्यार्थिनीला प्रमाणपत्र आणि पदक द्यायला मिळणार नाही याची खंत शिक्षिकेच्या मनात न राहावी म्हणून की काय शिक्षिका एक अनोखी गोष्ट करते. शिक्षिकेने नेमके काय केले ते व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) तुम्हीसुद्धा नक्की बघा…

हेही वाचा…पॅकबंद डब्यातील रसगुल्ले खाताय? मग ‘हा’ VIRAL VIDEO अगदी शेवटपर्यंत बघा, अंगावर येईल काटा

व्हिडीओ नक्की बघा…

विद्यार्थिनीचा कटआऊट बनवला

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, शिक्षिकेने विद्यार्थिनीचा एक कटआऊट बनवून घेतला आहे आणि हा कटआऊट शिक्षिका पदवीप्रदान समारंभात घेऊन आली आहे. मंचावर उभे करून शिक्षिकेने विद्यार्थिनीच्या कटआऊटच्या गळ्यात पदक घातले आहे. ही खास गोष्ट करताना शिक्षिकासुद्धा भारावून गेली आहे आणि तिला रडू कोसळले आहे. त्याचप्रमाणे त्या पदवीप्रदान समारंभात शिक्षिकेच्या या कृत्याचे उपस्थित सगळ्यांनी जागेवर उभे राहून टाळ्या वाजवत कौतुक केले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @growthlines या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. विद्यार्थिनीचे ग्रॅज्युएशन होण्यापूर्वीच निधन झाले म्हणून शिक्षिकेने ही खास गोष्ट केली. शिक्षिकेबद्दल प्रचंड आदर वाटतोय, असा मजकूर त्यांनी व्हिडीओवर लिहिला आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत. तसेच अनेक जण शिक्षिकेबद्दल आदर व्यक्त करीत तिचे कौतुक करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांची मने जिंकली आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows student passed away before her graduation so techer make her cutout huge respect for teacher asp