Viral Video Shows How to Pack Rasgulla In Factory : एखादा सण असो किंवा आनंदाची बातमी; मिठाई आवर्जून घरी आणली जाते. भारतात विविध प्रकार, पद्धती, आकार अन् चवीच्या मिठाया आढळतात. तसेच या मिठायांना स्वतःचा एक इतिहास आणि स्वतःची एक ओळख आहे. बदलत्या काळानुसार काही मिठाया पॅकबंद स्वरूपात आपल्यासमोर येतात. मिठायांचा टिकाऊपणा वाढविण्यासाठी वेगवेगळे तंत्रज्ञान वापरले जात आहे. पण, या पॅकबंद मिठाया आपल्यासाठी सुरक्षित आहेत का? तर नाही… कारण आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे.
व्हायरल व्हिडीओत एक छोटा कारखाना दिसत आहे. तेथे रसगुल्ले पॅक करण्याची तयारी सुरू आहे. एक कामगार भांड्यातून तयार रसगुल्ले झाऱ्याद्वारे काढून, एका मोठ्या परातीत ठेवतो आहे. पण, या परातीत ठेवलेले रसगुल्ले अगदी विचित्र पद्धतीने डब्यात भरले जात आहेत. चमच्याद्वारे दोन कामगार परातीतून पॅकबंद डब्यात रसगुल्ले भरण्यास सुरुवात करतात. ते भरताना रसगुल्ल्यांचा पाक अन् रसगुल्ले टेबलावर पडलेले दिसत आहेत. तेथे कोणत्याही कामगाराने हातमोजेही घातलेले दिसत नाही. एकदा बघाच हा व्हायरल व्हिडीओ (Viral Video).
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत (Viral Video ) तुम्ही पाहिलं असेल की, कोणत्याही कामगाराने हातमोजे घातलेले नाहीत. मोठ्या पातेल्यातून काढून रसगुल्ले परातीत ठेवले जात आहेत. त्यानंतर ते चमच्याद्वारे डब्यात भरताना टेबलावरसुद्धा पडल्याचे दिसत आहे. डब्यात रसगुल्ले भरल्यानंतर ते पॅकबंद करण्यासाठी पुढे पाठवले जात आहेत अशा रीतीने मग हे पॅकबंद डबे मार्केटमध्ये विकण्यासाठी तयार होत आहेत. फक्त यंत्राद्वारे डबा पॅक करणाऱ्या कामगाराने हातमोजे घातल्याचे दिसत आहे. पण, संपूर्ण कारखान्यात पाणीच पाणी दिसते आहे आणि अशा अस्वच्छतायुक्त अवस्थेत रसगुल्ले पॅक केले जात आहेत.
अजून खा रसगुल्ले
पॅकबंद डब्यातील रसगुल्ले आपल्यातील अनेकांना आवडतात. त्यामुळे रसगुल्ल्यांची पॅक करण्याची पद्धत पाहून सोशल मीडियावर संताप व्यक्त होताना दिसत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ @kharartochd या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून रसगुल्लाप्रेमींना कमेंटमध्ये टॅग करून ‘अजून खा रसगुल्ले’ असे म्हणत आहेत. तर एका युजरने, “डब्यात किती रसगुल्ले भरले हे मोजतसुद्धा नाही आहेत,” अशीही कमेंट केली आहे.