Video Shows Wife Give Surprise To Husband : अनेकदा पुरुषांची बाईक घेण्याची इच्छा असते; पण कुटुंबातील खर्च किंवा भविष्यासाठी सेव्हिंग करण्यासाठी ते कधी स्वतःच्या आवडी-निवडींकडे लक्षच देत नाहीत. त्यामुळे लग्न झाल्यानंतर अनेकदा बायको या गोष्टी लक्षात ठेवून, त्यांच्या आवडीनिवडी पूर्ण करताना दिसते. तर आज सोशल मीडियावर असेच काहीतरी पाहायला मिळाले आहे. बायकोने नवऱ्याला खास सरप्राईज दिले आहे.

व्हायरल व्हिडीओ कुठला आहे याची माहिती कळू शकलेली नाही. पण, एका कुटुंबात खास पाहुण्याची एंट्री झालेली दिसते आहे. दारात एक मुलगा बाईक घेऊन येतो. घरातील लहान मुलगा बाईक बघून आश्चर्यचकित होतो आणि जोरात उड्या मारू लागतो. ही बाईक कुटुंबातील बायकोने नवऱ्यासाठी आणलेली असते; पण नवरा मात्र एकटक बाईककडे बघत राहतो. त्याला कशाप्रकारे व्यक्त व्हावे हेच सुचत नसते. हातातल्या वस्तू बायकोकडे देऊन, तो बायकोकडे बघतो आणि तिला जवळ घेऊन मिठी मारतो. दोघांच्याही डोळ्यांत आनंदाश्रू असतात.

डोळ्यांतील अश्रू सगळं सांगून गेले (Viral Video)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, नवरा-बायकोला रडताना पाहून कुटुंबातील सगळ्याच सदस्यांच्या डोळ्यात पाणी येते. नवरा स्वतःसाठी बाईक खरेदी करू शकत होता; पण त्याने कधीच स्वतःसाठी बाईक घेण्याचा विचार केला नाही. पण, त्याच्या बायकोला त्याच्या भावना समजल्या हे पाहून तो नि:शब्द आणि आश्चर्यचकित झाला. त्याची ती स्थिती पाहून बायकोबरोबर कुटुंबातील इतर सदस्यही भावूक झाले. एकदा बघाच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @bhagyashreekarnikpatil या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून खूप भावूक झाले आहेत. “अशी जीव लावणारी असल्यावर आणखीन काय पाहिजे. मस्त. सरप्राईज तुम्हाला मिळालं; पण डोळे आमचे पाणावले”, “काही बोलला नाहीस; पण डोळ्यांतील अश्रू सगळं सांगून गेले”, “तुझ्या डोळ्यांतले अश्रू सांगत आहेत, तू किती खुश आहेस ते”, “मर मर मेला कुटुंबासाठी; पण कुटुंबानं तुझी राखली दादा. जिंकलास तू” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.