Video Shows That One Friend who encourages you : आयुष्यात प्रत्येक व्यक्ती खऱ्या मित्राच्या शोधात असते, जो आपल्या सुख-दु:खात नेहमी आपल्याबरोबर असेल. एक कॉल केला की आपल्या दारात येऊन उभा राहील, कठीण परिस्थितीत रस्ता दाखवेल, आपण चुकल्यास न डगमगता आपली चूक दाखवून देईल, तर चुकीचे नसताना आपली साथ सोडणार नाही. कारण एखादी व्यक्ती आई-बाबा, प्रियकर-प्रेयसी, नातेवाईक नाही तर अशाच एक मित्राजवळ आपल्या मनातील सगळ्या भावना अगदी न घाबरता शेअर करते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल होतो आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ (Video) कराटे क्लासेसचा आहे. दोन मित्रांमध्ये कशी मैत्री असते याचे उत्तम उदाहरण दाखवण्यात आले आहे. पहिला मित्र विरुद्ध टीमबरोबर कराटे करण्यास सुरुवात करतो. त्यादरम्यान तो मध्येच थांबतो. हे पाहून प्रेक्षकांमध्ये बसलेला त्याचा मित्र कशापद्धतीने समोरच्याला मात द्यायची हे ॲक्शनद्वारे दाखवतो, तर मित्राने ॲक्शन करून दाखवताच तो समोरच्या प्रतिस्पर्ध्याला हरवतो आणि जिंकतो. हे पाहून प्रेक्षकांमध्ये बसलेला मित्र आनंदाने नाचू लागतो. नक्की बघा हा व्हायरल व्हिडीओ.

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, गोंधळलेल्या मित्राला प्रोत्साहन देण्याचे काम त्याचा खास मित्र करतो. नक्की कशाप्रकारे प्रतिस्पर्ध्याला हरवायचे हे त्याला ॲक्शनद्वारे दाखवतो. मित्रदेखील विश्वास ठेवून अगदी तीच ॲक्शन प्रतिस्पर्ध्याबरोबर करतो आणि त्याला हरवतो. हे पाहून प्रेक्षकांमध्ये बसलेला मित्र आनंदाने नाचून, टाळ्या वाजवण्यास सुरुवात करतो. तर जिंकलेला मित्र आपल्या खास मित्राला जाऊन नकळत मिठीसुद्धा मारतो. हे पाहून कठीण प्रसंगाच्यावेळी असा प्रोत्साहन देणारा एक तरी मित्र असावा, असे तुम्हाला नक्कीच वाटेल.

एक चांगला मित्र गुरुसमान असतो…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @pro_capitalmotivation07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘असा एक मित्र हवा जो तुम्हाला प्रोत्साहन देतो’; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ त्या खास मित्राला कमेंटमध्ये टॅग करताना दिसत आहेत. तसेच ‘योग्य वेळी योग्य मित्राचा सल्ला घेणे खूप चांगले असते बरं का, एक चांगला मित्र गुरुसमान असतो, आयुष्यात बरेच लोक येतात आणि जातात आणि स्वतःला मित्र म्हणवून घेतात; पण खरी मैत्री म्हणजे काय ते मला तुमच्याकडून कळलं’ आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows you need that one friend who encourages you in difficult situation asp