Viral Video: आजकालतची लहान मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रति मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आता अशाच एका गोड चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो खूप चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या‘स्वप्नात आली राणी मुखर्जी’, हे गाणं तर कधी ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’ ही गाणी खूप चर्चेत आहेत, ज्यावर लाखो युजर्स रील्स बनवताना दिसत आहेत. आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली ‘येणार साजन माझा’ या सध्या चर्चेत असलेल्या मराठी जुन्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्सही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली तिच्या घरामध्ये “झाल्या तिन्ही सांजा, करून शिणगार साजा वाट पाहते मी गं येणार साजन माझा”, या जुन्या मराठमोळ्या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. तिचा डान्स अन् तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून अनेकजण तिचं कौतुक करत आहेत. सध्या तिचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @adira_chavan या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत एक चार लाखाहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “खूप छान नाचलीस बेटा अशीच कायम हसत खेळत सुखी रहा ” आणखी एकाने लिहिलेय, “मस्त डान्स” आणखी एकाने लिहिलेय, “गोड किती गोड”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video small girl dance on zalya tinhi sanja video viral on social media sap