Viral Video: समाजमाध्यमांवर विविध विषयांवरील आधारित व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडीओ आपल्या अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. जो पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. अनेक महिला भाजी विकत घेताना भाजी ताजी आहे की शिळी हे व्यवस्थित बघून घेतात. परंतु कधी कधी या भाज्यांच्या ढिगाऱ्यात एखादा प्राणी लपलेला असू शकतो याची तुम्ही कल्पना केली आहे का? सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओत असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

हा व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती हिरव्या मिरच्यांनी भरलेली प्लास्टिकची पिशवी रस्त्यावर रिकामी करतो आणि मिरच्यांचा ढिग हाताने पसरवतो. यावेळी तिथे एक गाय त्या मिरच्या खाण्यासाठी येते. पण इतक्यात त्या मिरच्यांच्या ढिगाऱ्यात एक हिरव्या रंगाचा साप दिसून येतो. तो साप ढिगाऱ्यातून बाहेर येतो आणि तिथून निघून जातो. मिरचीच्या ढिगाऱ्यात लपलेल्या सापाला पाहून सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. त्यामुळे इथून पुढे भाजी विकत घेताना काळजी घ्या.

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओवर लिहिलेल्या काही ओळींनुसार ही घटना शाहपुरा भाजी मंडईतील असल्याचे म्हटले जात आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @shahpura_vlogsया अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत १० मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.

एका युजरने लिहिलंय की, “बापरे खूपच भयानक दृश्य आहे”. तर दुसऱ्याने लिहिलंय की, “आईशप्पथ आता भाजी विकत घेण्याची पण भिती वाटतेय”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “हा वॉटर स्नेक आहे”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “हा जर घरात गेला असता तर?”