Viral Video Students Surprise Tuition Teacher : आई-बाबा दोघेही नोकरी जात असल्यामुळे घरी येऊन जेवण करायचं की, मुलांचा अभ्यास घ्यायचा अशी परिस्थिती उद्भवत असल्यामुळे अनेक जण मुलांना ट्युशनला टाकतात. जिथे मुलांचा अभ्यासही होईल आणि घरी आई-बाबा येईपर्यंत मग्नही राहतील. पण, अनेकदा ट्युशन घेणाऱ्या शिक्षकांना तेवढा मान-सन्मान दिला जात नाही. पण, आजचा व्हायरल व्हिडीओ पाहून कदाचित तुमचेही मन बदलून जाईल.
ट्युशन घेऊन एवढे किती पैसे मिळतात तुला, हे किती छोटं काम आहे, मुलांना शिकवून काय मिळतं तुला असे अनेक प्रश्न ट्युशन शिक्षकांना विचारले जातात. पण, काही ट्युशन शिक्षकांना शिकवण्याची आवड, मुलांना एखादा विषय त्यांच्या भाषेत समजावून सांगण्याचा छंद असतो. त्यामुळे ते पैशांकडे न बघता आपल्याकडून शाळा, कॉलेजचे विद्यार्थी काय शिकून जातात यामध्ये सुख मानतात.
शिक्षक म्हणून काम करणे हा व्यवसाय नाही (Viral Video)
अलीकडेच अशाच एका ट्युशन शिक्षिकेच्या घरी शिक्षक दिन साजरा केला आहे. ट्युशनच्या शिक्षकेच्या पायाला दुखापत झालेली असते. पण, ही निरागस मुले मिळून हा दिवस आणखीन खास करतात. पिनाने फुगे फोडून आधी शिक्षिकेचे स्वागत करतात. मग शिक्षिकेचा बेडरूम पताके, रिबीन आणि फुग्यांनी सजवतात. त्यानंतर केक कापून शिक्षक दिन साजरा करतात; जे पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @peudey001 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “शब्दात वर्णन करता येत नाही….. शिक्षक म्हणून काम करणे हा केवळ एक व्यवसाय नाही…. तो विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील भावनिक बंधन आहे….” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा हा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि शिक्षक दिनाच्या शुभेच्या शिक्षिकेला देताना दिसत आहेत.