Viral Tempo Video : प्रवासादरम्यान सजवलेला टेम्पो पाहताना खूप मजा वाटते. टेम्पोपुढे लावलेल्या झिरमिळ्या, लायटिंग आदी अनेक वस्तू वाऱ्याबरोबर झुलताना पाहायला मिळतात. एकूणच या सगळ्या वस्तू टेम्पोच्या सौंदर्यात भर घालतात. त्याचबरोबर अनेक टेम्पो, ट्रकचालक गाडीच्या मागे एक पाटीसुद्धा आवर्जुन लावतात. या पाटीवर लिहिलेली वाक्य कधी कधी हसवतात, कधी विचार करायला भाग पडतात, तर कधी जीवनाचा खरा अर्थ सांगून जातात…
तर आज असाच एक व्हिडीओ प्रवाशाने शेअर केला आहे. नाशिक-पुणे हायवेवरून जाताना एका दुचाकीचालकाला त्याच्या अगदी पुढे धावणारा टेम्पो दिसला. टेम्पोच नाही तर त्या टेम्पोच्या मागे लिहिलेली एक सुंदर पाटी त्याचे सतत लक्ष वेधून घेत होती, कारण त्यामध्ये “शरीराला आणि आई-बापाला जपा; बाकी कोणी कामाला येणार नाही लक्षात ठेवा”; अशी सुंदर ओळ लिहिलेली असते. हे पाहून दुचाकीचालकाचे मन भरून येते आणि तो टेम्पोच्या पाटीची सुंदर ओळ मोबाईलमध्ये व्हिडीओमार्फत कैद करून घेतो.
आई-बाबा ही जगातील सर्वात मोठी ताकद (Viral Video)
टेम्पोच्या पाटीवर लिहिल्याप्रमाणे “शरीराला आणि आई-बापाला जपा; बाकी कोणी कामाला येणार नाही लक्षात ठेवा”, म्हणजे जन्माला घालणारे आई-बाबा आणि काम, अभ्यास करण्यासाठी सतत ऊर्जा देणारे शरीर या तीन गोष्टी आपल्या आयुष्यात खूप जास्त महत्त्वाच्या असतात. आपण सगळ्यांची मनं जपायला जातो, पण जगण्यासाठी आई-बाबांची गरज असते, तसेच जिवंत राहण्यासाठी निरोगी शरीराची आवश्यकता असते. छोट्या छोट्या स्वप्नांपर्यंत पोहचण्यासाठी आई-बाबांचा पाठिंबा आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी शरीराची धडपड गरजेची असते, त्यामुळे ही सुंदर पाटी टेम्पोचालकाने लिहिलेली आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ @mahapamahapashelke या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “आज सकाळी बघितलेलं सगळ्यात सुंदर वाक्य”; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि “खरंच खूप छान लिहिले आहे”, “आई आणि बाप ही जगातील सर्वात मोठी ताकद आहे; ज्याला समजली त्याला आयुष्य कसं जगायचं कळलं”, “खरचं खूप छान लिहिलंय राव” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.